”तपास पूर्ण झाल्यानंतर तपास यंत्रणा कारवाई करते”, अमित शाहांचं विधान!

जाणून घ्या, अमित शाह यांनी असं का बोलून दाखवलं आहे?

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून कोणावरही कारवाई करणे ही भारतीय जनता पक्षाची (भाजप) संस्कृती नाही आणि तपास यंत्रणांनी तपास पूर्ण केल्यानंतरच कारवाई केली जाते. After the completion of the investigation the investigation agency takes action Amit Shahs statement

केंद्राला माहिती असतानाही भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या भाजपच्या माजी नेत्या विजयशांती यांनी केला आहे.

याबाबत विचारले असता, शाह म्हणाले की, भाजपाने तेलंगणा निवडणूक जाहीरनाम्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत (बीआरएसच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची) चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

ते येथे पत्रकारांना म्हणाले, “तेलंगणातही भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा लढा जोरात सुरू आहे. केवळ निवडणुका आहेत म्हणून तपास पूर्ण न करता एखाद्यावर कारवाई करणे ही भाजपची संस्कृती नाही. केसीआर यांनी आमच्या नेत्यांना ज्या प्रकारे त्रास दिला, तसे आम्ही कुणालाही करत नाही.

After the completion of the investigation the investigation agency takes action Amit Shahs statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात