वृत्तसंस्था
मुंबई : स्मार्टकार्ड वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) छपाईसाठी नवीन करार करण्यात आला असून नव्या आरसी आणि लायसन्स चिपऐवजी क्यूआर कोड असून डिजिटल स्वरूपात ते उपलब्ध होणार आहे. कार्डवर अवयवदानासह रक्तगटाचीही माहिती देण्यात आली आहे. ऑगस्टपासून सर्व वाहनचालकांना नवीन आरसी बुक येत आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली.Big News : Now QR Code on RC Book, License; Also note the blood group; New RC book for all drivers from August
नव्या रूपातील स्मार्ट कार्ड पुरवण्याचे कंत्राट कर्नाटकातील एमसीटी कार्ड अँड टेक्नॉलॉजी कंपनीला देण्यात आले असून वितरण सुरू आहे. स्मार्ट कार्ड निळ्या रंगाचे आहे. कार्डाच्या पुढील बाजूस नाव, पत्ता, जन्मतारीख, अवयवदानासह रक्तगटाची माहिती असेल. मागील बाजूस क्यूआर कोड व कार्डच्या मुदतीसह इतर माहिती आहे.
कोणते आरसी बुक कुठे होतंय तयार?
एमएच – ०१ ते एमएच – १७ पर्यंतचे आरसी बुक मुंबईत तयार होत आहे. तर एमएच १८ ते एमएच – ३४ पर्यंतचे आरसी बुक छत्रपती संभाजीनगर येथे तयार होत आहे. त्याचप्रमाणे एमएच ३५ ते एमएच – ५१ क्रमांकांपर्यंतचे आरसी बुक नागपूर शहरात तयार होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App