प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. शिंदे – फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ही यादी जाहीर झाली आहे. त्यात अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद दिले आहे, पण ते देण्यापूर्वी भाजप श्रेष्ठींनी अजितदादांना तब्बल तीन महिने तंगविले आणि नंतरच अजितदादांचा पुण्याच्या पालकमंत्री पदाचा हट्ट पूर्ण केला.Ajitdad’s insistence on the post of Guardian Minister of Pune
आत्तापर्यंत अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाबरोबर पालकमंत्री पुण्याचे पालकमंत्री पद मिळणे राजकीय दृष्ट्या स्वाभाविक मानले जायचे. पण शिंदे – फडणवीस सरकारमध्ये तशी परिस्थिती उरलेली नाही.
अजितदादांनी शिंदे – फडणवीस सरकार मध्ये तिसऱ्या क्रमांकावर येऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वीकारले. त्याच वेळी त्यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची अपेक्षा होती, पण त्यावेळी भाजपा श्रेष्ठींनी ती इच्छा पूर्ण केली नाही. मग त्या मागणीसाठी अजितदादांना दोनदा आजारी पडावे लागले. नाराजी व्यक्त करावी लागली आणि त्यानंतरच भाजप श्रेष्ठींनी अजितदादांची पालकमंत्री पदाची मागणी पूर्ण केली.
भाजपा श्रेष्ठींनी अजितदादांची मागणी पूर्ण केली असली तरी छगन भुजबळ यांना मात्र वेटिंग वरच ठेवले आहे. त्यांना नाशिकचे पालकमंत्री व्हायचे आहे, पण ते पालकमंत्री पद दादा भुसे यांच्याकडे आहे आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू दादा भुसे या पालकमंत्री पदावर कायम आहेत.
चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन दूर करत त्यांच्याकडे सोलापूरचे पालक मंत्रीपद सोपवले आहे.
नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचं तिढा सुटत नव्हता. स्वातंत्र्य दिनी देखील अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केले होते.
12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी :
पुणे : अजित पवार,
अकोला : राधाकृष्ण विखे- पाटील,
सोलापूर : चंद्रकांत दादा पाटील
अमरावती : चंद्रकांत दादा पाटील
वर्धा : सुधीर मुनगंटीवार
भंडारा : विजयकुमार गावित
बुलढाणा : दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर : हसन मुश्रीफ
गोंदिया : धर्मरावबाबा आत्राम
बीड : धनंजय मुंडे
परभणी : संजय बनसोडे
नंदूरबार : अनिल भा. पाटील
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App