स्वातंत्र्य काँग्रेसने आणलं, तुमच्या घरातलं कुत्र तरी मेलं का?; मल्लिकार्जुन खर्गेंची घसरली जीभ

वृत्तसंस्था

अलवर : देशाचं स्वातंत्र्य काँग्रेसने आणलं, तुमच्या घरातलं कुत्र तरी मेलं का??, असा सवाल करून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपली जीभ घसरल्याचा प्रत्यय दिला. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राजस्थानातल्या अलवर मध्ये खासदार राहुल गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत भाषण करताना मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली. खर्गेंच्या या भाषणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत आणि काँग्रेस सह त्यांच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे. Freedom was brought by Congress, did your dog die?

अलवरच्या सभेत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, की भारताचा स्वातंत्र्य काँग्रेसने आणलं. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संघर्ष केला. देशाच्या ऐक्यासाठी इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी आपल्या जीवनाची कुर्बानी दिली. पण देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसने आणला असताना तुमच्या घरातलं कुत्र तरी मेलं का??, असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

याच सभेत बोलताना राहुल गांधींनी भाजपच्या नेत्यांवर प्रचंड टीका केली. भाजपचे नेते प्रत्येक ठिकाणी इंग्रजीचा विरोध करतात. पण जनतेने त्यांना विचारले पाहिजे, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी इंग्रजीला विरोध करता पण तुमची मुलं कोणत्या मिडीयमच्या शाळेत शिकतात?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=FApobDWCoS0

या सभेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थान घरगुती गॅस सिलेंडर सर्वसामान्य जनतेला 500 रुपयांत देण्याची घोषणा केली. जे गॅस सिलेंडर 1000 रुपयांच्या वर जनतेला मिळतात, ते एक वर्षभराचे 12 सिलेंडर 500 रुपयांत देण्याची तरतूद 2022 – 23 च्या राजस्थानच्या अर्थसंकल्पात केली जाईल, असे अशोक गेहलोत म्हणाले.

मात्र, या सगळ्यांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली असून सगळीकडून त्यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसने स्वातंत्र्य आणले, असा दावा जर मल्लिकार्जुन खरेदी करतात, तर त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या तोंडी इतरांना कुत्रं म्हणणारे भाषा शोभते का??, असे सवाल अनेकांनी सोशल मीडियावर केले आहेत.

Freedom was brought by Congress, did your dog die?

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात