2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यावेळचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हिंदुत्वाचा मार्ग पकडत टेम्पल रन सुरू केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस 2022 मध्ये राहुल गांधी यांचे अनुकरण करताना दिसत आहे. अर्थात सॉफ्ट हिंदुत्वाचा राष्ट्रवादीचा मार्ग राहुल गांधी यांच्यापासून सुरू होऊन व्हाया ममता बॅनर्जी असा झाला आहे. इतकेच नाही तर राष्ट्रवादीचा राजकीय प्रवास देखील नास्तिकता ते मुख्यमंत्रीपदासाठी तुळजाभवानी मातेला नवस व्हाया दगडूशेठ हलवाई गणपतीचे बाहेरून दर्शन असा होत आहे!! Atheism vows to Tulja Bhavani for the post of Chief Minister
दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी पुण्यातल्या सुप्रसिद्ध दगडूशेठ मंदिराच्या बाहेरून गणपतीचे दर्शन घेतले. आपण मटण खाल्लेले असल्यामुळे गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत नाही, असे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना म्हणाले होते. पण आता पवारांच्या कन्या बारामतीचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी नुसते दर्शनच घेतले असे नाही तर महाराष्ट्राच्या कल्याणाची कामना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे. बळीराजाचे राज्य येऊ दे. सर्वांचे कल्याण होऊ दे, अशी मागणी त्यांनी तुळजाभवानी आईच्या चरणी केली. पण त्या पुढे जात त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्री होऊ दे मी सगळ्या पक्ष घेऊन तुळजाभवानीचा नवस फेडायला येईल असे म्हटले आहे. हाच तो राष्ट्रवादी काँग्रेसचा टेम्पल रन आहे!!
– नास्तिकतेचा मुद्दा
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार हे नास्तिक आहेत, असा मुद्दा उपस्थित केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची देवावरची भक्ती अधिकाधिक बाहेर दिसायला लागली आहे. पण त्याच वेळी केवळ ही निष्काम भक्ती नसून मुख्यमंत्रिपदाच्या श्रेयसची प्राप्ती करण्यासाठी भक्ती असल्याचे सुप्रिया सुळे यांनी उघडपणे दाखवून दिले आहे!!
राहुल गांधी यांचा 2019 चा टेम्पल रन अगदीच वाया गेला नाही. काँग्रेसचे 2014 मध्ये 44 खासदार लोकसभेत निवडून आले होते. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी टेम्पल रन केल्यानंतर त्यामध्ये 10 खासदारांची भर पडून 54 खासदार झाले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना ही टेम्पल रनचा फायदा झाला. त्या पुन्हा सत्तेवर आल्या. मग भले ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम तुष्टीकरणाचे आपले धोरण पुढे चालू का ठेवले असेल ना!! निवडणुकीतील टेम्पल रनचा त्यांना फायदा झाला ही वस्तुस्थिती आहे.
– नवाब मलिक यांच्या पाठीशी
सध्या देखील शरद पवार असोत किंवा सुप्रिया सुळे असोत पक्षाचे धोरण म्हणून ते नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. नवाब मलिक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी घेतलेला नाही. तुरुंगात राहूनही नवाब मलिक मंत्री आहेत. असे असतानाही पवार दगडूशेठ मंदिराच्या बाहेरून गणपतीचे दर्शन घेतात आणि सुप्रिया सुळे तुळजाभवानी मंदिरात जाऊन राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्रीपदासाठी नवस बोलतात यातच त्यांच्या टेम्पल रनचे सौख्य सामावले आहे!!
अर्थात राहुल गांधी राहुल गांधी यांना टेम्पल रन चा औषधा अंशतः झालेला फायदा आणि ममता बॅनर्जी यांना पूर्ण सत्तेवर येण्याचा झालेला फायदा हे पाहता राष्ट्रवादीला या टेम्पल रनचा नेमका किती फायदा होतो हे आगामी निवडणुकाच महाराष्ट्राला सांगतील!! त्यासाठी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली थोडी वाट पाहावी लागेल!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App