Yogi Effect : उत्तर प्रदेशात तब्बल 60,000 हजार भोंगे उतरवले; अन्य 60,000 भोंग्यांचे आवाज घटविले!!

वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीचा जबरदस्त इफेक्ट दिसला आहे. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी आवाज टाकला आहे. पण त्याचे पडसाद योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात उमटवून दाखवले आहेत. As many as 60,000 loudspeaker were sounded in Uttar Pradesh

उत्तर प्रदेशात ईद पूर्वी 2 2022 पर्यंत मशिदींवरचे तब्बल 60,000 भोंगे उतरवण्यात आले आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांचे सहाय्यक पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशात सामाजिक सौहार्द राखणे हे पोलिसांचे सर्वाधिक प्राधान्य आहे, असे सांगून त्यांनी राज्यभरात ईदच्या प्रार्थनेसाठी कशी व्यवस्था केली आहे, याचे वर्णन केले आहे.

राज्यात 31,151 जागांवर नमाज़ अदा करण्यात येईल. 2,846 जागा चिन्हित करून त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे. धर्मगुरुंसमवेत बैठका करून परस्पर सहमतीतून तब्बल 60,000 भोंगे मशिदींवरून काढून टाकले आहेत. बाकीच्या सुमारे 60,000 भोंग्यांचे आवाज कमी केले आहेत. उत्तर प्रदेशात कोठेही शांतता भंग होणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत. कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची पोलिसांची तयारी आहे, असे प्रशांत कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

As many as 60,000 loudspeaker were sounded in Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात