विशेष प्रतिनिधी
मुंबई : संभाजीनगर मध्ये पोलिसांनी 144 कलम लावली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेविषयी सामान्य शंका निर्माण झाली आहे पण तरीही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करत राज ठाकरे यांच्या सभेचा नवा टीजर रिलीज केला आहे. Raj Thackeray: Article 144 in Sambhajinagar; I am not a fanatic, I am a fanatic, new teaser of MNS !!
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यावरुन केलेल्या वक्तव्यानंतर, तसेच हनुमान जयंतीला पुण्यात केलेल्या महाआरतीनंतर आता महाराष्ट्र दिनी 1 मे ला संभाजी नगर येथे होणा-या सभेत राज ठाकरे कोणती नवीन घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे संभाजीनगरचे जबरदस्त टिझरदिनांक: १ मे रविवारस्थळ-मराठवाडा सांस्कृतिक मंडळवेळ-सायंकाळी ५:३० वाजता@RajThackeray@mnsadhikrut@anilshidore @rajupatilmanase @SandeepDadarMNS @GajananKaleMNS @aajtak @ABPNews @indiatvnews @ZeeNews pic.twitter.com/vwmjP5glqJ — Sumit Khambekar (@KhambekarSumit) April 26, 2022
मनसे संभाजीनगरचे जबरदस्त टिझरदिनांक: १ मे रविवारस्थळ-मराठवाडा सांस्कृतिक मंडळवेळ-सायंकाळी ५:३० वाजता@RajThackeray@mnsadhikrut@anilshidore @rajupatilmanase @SandeepDadarMNS @GajananKaleMNS @aajtak @ABPNews @indiatvnews @ZeeNews pic.twitter.com/vwmjP5glqJ
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) April 26, 2022
मात्र राज ठाकरे यांना उद्देशून बिनकामाचे भोंगे आणि काडीची किंमत देत नाही, अशा शेलक्या शब्दांत मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरसंधान साधत संभाजीनगर मध्ये 144 कलम लावले आहे.
सध्या या सभेपूर्वी राज्यातील वातावरण तापले आहे. तसेच, राज्य सरकारने संभाजीनगरमध्ये मंगळवारपासून जमाबंदीचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता मनसेची सभा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पण मनसेने मात्र या सभेची जय्यत तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने या सभेचा टीझरही प्रदर्शित केला आहे.
या टिझरमध्ये राज ठाकरे यांनी चलो संभाजीनगर असा नारा दिला आहे. टीझरमध्ये राज ठाकरे यांच्या भाषणामधील मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे ही ओळ आवर्जून वापरली आहे. गुढीपाडवा मेळाव्याला झालेल्या सभेपासून मनसे प्रखर हिंदुत्व घेऊन समोर आले आहे. त्यामुळे आता होणाऱ्या सभेला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नसली, तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेज उभारण्याची तयारी केली आहे. सभेसाठी पोलिसांनी बाळगलेल्या मौनामुळे सभेबाबत अजूनही सस्पेन्स आहे. दुसरीकडे मात्र मनसे पदाधिकारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्यावर ठाम आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App