कोथरूडमध्ये 13 वर्षीय विशेष मुलाचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात गुंडाळून फेकून दिल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. Physical challenge 13yrs child murder in Kothrud area, police Arrested one suspect person
विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील एका शाळेत 11 वर्षीय मुलीवर शाळेत शिरून अनोळखी इसमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर आता कोथरूडमध्ये 13 वर्षीय विशेष मुलाचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात गुंडाळून फेकून दिल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.
करण गोपाल राठोड (वय -13) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
कोथरूड परिसरात एकलव्ह्य कॉलेज भागात असलेल्या शाळेच्या मैदानात टेकडी जवळ गुरवारी रात्री साडेआठ ते पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास एका पोत्यात अनोळखी मुलाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळताच, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सह्याक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मुलाची पोलिसांनी ओळख पटवून त्याचा खुनातील आरोपीचा तात्काळ शोध सुरू केला. त्यानंतर काही धागेदोरे पोलिसांना मिळाले आणि त्यांनी एक संशयित आरोपी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.याबाबत पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App