१५ मिनिटं पोलीस हटवा, आम्ही हिंदूंना बघून घेऊ अशी वक्तव्य करणारे लोक कायमच धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. हिंदू-मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करणं हेच या लोकांचं राजकारण आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते शाहनवाझ हुसेन यांनी एमआएमवर टीका केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : १५ मिनिटं पोलीस हटवा, आम्ही हिंदूंना बघून घेऊ अशी वक्तव्य करणारे लोक कायमच धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. हिंदू-मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करणं हेच या लोकांचं राजकारण आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते शाहनवाझ हुसेन यांनी एमआएमवर टीका केली आहे.
Shahnawaz Hussain criticizes MIM
रिपब्लिक टीव्हीवरील चर्चासत्राच्या कार्यक्रमात सूत्रसंचालक अर्णब गोस्वामी यांनी वारिस पठाण यांना हिंदू-मुस्लीम मुद्द्यावरून राजकारण न करण्याची शपथ घ्या असं आवाहन केलं. या विषयावर बोलताना शाहनवाझ हुसेन म्हणाले की, एमआयएम हा रझाकारांचा पक्ष आहे. हे केवळ मुस्लीम लोकांचाच विचार करतात. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातदेखील हे लोक राजकारण करण्यात व्यस्त होते.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षानेही बंगालमध्ये निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमला भाजपाने पैसे देऊन मुद्दाम बंगालमध्ये निवडणुका लढवण्यास प्रवृत्त केलं आहे आणि मुस्लीम मतांचं हे राजकारण असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. भाजपा आणि एमआयएम यांची छुपी युती असल्याचे दोन्ही पक्षांवर आरोप होत असताना भाजपाचे नेते शाहनवाझ हुसेन यांनी एमआयएमवर टीका केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App