कारखाना प्रशासनाकडुन सुमारे एक हजार ऊसतोड मजुरांना सुरक्षीतस्थळी निवारा देण्यात आला आहे. त्यामुळे मजुरांनी समाधान व्यक्त केले.Karhad: Unstodhi stagnant due to untimely rains; Time to close the cane mill
विशेष प्रतिनिधी
कऱ्हाड : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.दरम्यान अवकाळी पावसाने ऊसतोडी ठप्प परिणाम ऊस गाळपावर झाला आहे. ऊसाची आवक बंद झाल्याने आणि साखर कारखान्यातील बगॅस भिजल्याने ऊसाचे गाळप बंद करण्याची वेळ यशवंतनगर (जि.सातारा) येथील सह्याद्री कारखान्यांवर आली आहे.
साखर कारखान्यांचा हंगाम सुरु असल्याने ऊसतोडीसाठी मजुर विविध भागातुन कारखाना कार्यक्षेत्रात आले आहेत. ते झोपडी करुन राहतात. कालपासुन सुरु असलेला पाऊस रात्रभर बरसला. त्यामुळे मजुरांच्या झोपड्यांत पाणी गेले.
काहींचे साहित्यही त्या पाण्यात तरंगत होते. दरम्यान सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर तोडणी मजूरांची सुमारे एक हजार कुटूंबे झोपडी करून राहत आहेत. काल पडलेल्या पावसाचे पाणी त्यांच्या झोपडीमध्ये शिरून, अन्न धान्य, कपडे यांसह घरगुती साहित्य भिजून गेले.
दरम्यान कारखाना प्रशासनाकडुन सुमारे एक हजार ऊसतोड मजुरांना सुरक्षीतस्थळी निवारा देण्यात आला आहे. त्यामुळे मजुरांनी समाधान व्यक्त केले.त्यांना तातडीने खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. कारखान्याने केलेल्या या व्यवस्थेबपद्दल मजुरांनी समाधान व्यक्त केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App