आता चक्क ईएमआयवर विमानप्रवास, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी विमान कंपनीची क्लुप्ती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विमान प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी एका विमान कंपनीने अनोखी क्लुप्ती लढविली आहे. आता प्रवाशांना ईएमआयवर विमानाचे तिकिट खरेदी करावे लागणार आहे. तीन महिन्यांच्या आत पैसे भरले तर त्यासाठी कोणतेही व्याजही आकारले जाणार नाही.Airtravel on EMI, the airline’s idea to increase the number of passengers

सर्वसामान्यांनाही विमानाने प्रवास करण्याची इच्छा असते. परंतु, तिकिटाचे दर पाहून प्रवास करायला धजावत नाही. मात्र, त्यांच्यासाठी विमान कंपनीनेहा पर्याय दिला आहे. गेल्या काही महिन्यांत इंधन दर, सुरक्षा कर आणि विमानतळ विकास शुल्कात मोठी वाढ झाल्याने हवाई प्रवास महागला आहे.



सर्वसामान्य नागरिक विमान प्रवासाकडे पाठ फिरवू लागले आहेत. याचा परिणाम दैनंदिन प्रवासी संख्येवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे स्पाईस जेट या विमान कंपनीने ईएमआयवर तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे पैसे प्रवाशांना ३, ६ किंवा १२ हप्ते करून भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

महिन्यांत पैसे दिल्यास ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना पॅन क्रमांक, आधार क्रमांक किंवा यूआयडी ही कागदपत्रे सादर करावी लागतील. पासवर्डच्या माध्यमातून त्यांची पडताळणी करावी लागेल.

Airtravel on EMI, the airline’s idea to increase the number of passengers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात