Sheikh Hasina : शेख हसीना भारत कधी सोडणार ? परराष्ट्र मंत्रालयाने दिले उत्तर

Sheikh Hasina

बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांच्या वृत्तांबाबतही दिली आहे प्रतिक्रिया


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बांगलादेशमधील परिस्थिती अजून सुधारलेली नाही. अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले होत आहेत. हिंदूंना लक्ष्य करून त्यांची घरे जाळली जात आहेत. दरम्यान, शेख हसीना ( Sheikh Hasina) भारतातून जाण्याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे वक्तव्य समोर आले आहे.

शेख हसीना भारत कधी सोडणार या प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी उत्तर दिले. त्यांच्या योजनेबाबत अद्याप आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, मात्र त्यावर निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.



परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांच्या वृत्तांबाबत विचारले असता ते म्हणाले की आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, आमच्यासाठी बांगलादेशातील भारतीयांचे हित सर्वोपरी आहे.

तसेच, प्रवक्त्याने सांगितले की बांगलादेशमधील अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी गट आणि संघटनांनी विविध पुढाकार घेतल्याचेही वृत्त आहे. ‘आम्ही या पावलांचे स्वागत करतो, परंतु कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत होईपर्यंत आम्ही खूप काळजीत राहू’ असंह परराष्ट्र मंत्रालाने म्हटलं होतं.

Sheikh Hasina leave India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात