हेलिकॉप्टरने टेकऑफ केल्यानंतर तीन मिनिटांनी नियंत्रणाशी संपर्क तुटला
विशेष प्रतिनिधी
काठमांडू : नेपाळमध्ये ( Nepals ) आणखी एक हवाई दुर्घटना घडली आहे. राजधानी काठमांडूच्या बाहेरील जंगल परिसरात हेलिकॉप्टर ( Helicopter ) कोसळले. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर अपघातात पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या विमानात चिनी नागरिक होते असे समजते. घटनेची माहिती मिळताच नेपाळ पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांच्या पथकाने बचावकार्य सुरू केले आहे.
काठमांडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर विमानतळाचे प्रवक्ते सुभाष झा म्हणाले की, एअर डायनेस्टीचे 9N-AZD हेलिकॉप्टर काठमांडूहून रसुवासाठी दुपारी 1:54 वाजता निघाले होते. हेलिकॉप्टर नुवाकोटच्या शिवपुरी जिल्ह्यात पोहोचताच ते कोसळले.
पोलिसांनी एक निवेदन जारी केले की हेलिकॉप्टरने टेकऑफ केल्यानंतर तीन मिनिटांनी नियंत्रणाशी संपर्क तुटला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेलिकॉप्टरने काठमांडूहून दुपारी 1:54 वाजता उड्डाण केले, परंतु टेकऑफ झाल्यानंतर तीन मिनिटांनी संपर्क तुटला. हेलिकॉप्टर अपघातात एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात दोन पुरुष, एक महिला आणि पायलटचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संपर्क तुटल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. आगीमुळे मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले आहेत. मृतदेहांची ओळख पटलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more