MVA parties : कुणी नाही मोठे, सगळेच छोटे; महाविकास आघाडी बनली तिळ्यांचे दुखणे!!


नाशिक : कुणी नाही मोठे, सगळेच छोटे; महाविकास आघाडी बनली तिळ्यांचे दुखणे!!, अशी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांची लोकसभा निवडणुकीनंतर अवस्था झाली आहे. कारण तिळ्यांमध्ये तिघेही थोडक्या वेळात आगे – मागे जन्माला आलेले असले, तरी त्यांना कोणी मोठे किंवा छोटे म्हणत नाही ते समान वयाचेच राहतात. तसेच महाविकास आघाडीचे ताकदीचे संतुलन घडल्याने आणि बिघडल्याने झाले आहे. म्हणून महाविकास आघाडीकडे तिन्ही घटक पक्ष “तिळे” बनले आहेत!! MVA parties pointing fingers at each other as small party

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुती वर मात केली. 48 पैकी 31 जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीचा हुरूप जरूर वाढला, पण तो हुरूप वाढतानाच महाविकास आघाडीत मोठा कोण आणि छोटा कोण??, याचा सुप्त वाद सुरू झाला. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतला तिसरा क्रमांकाचा घटक पक्ष काँग्रेस निवडणुकीनंतर एकदम पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स उंचावून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना मागे सारले. पण त्यामुळे भाविकासाठी पंचाईत अशी झाली, की शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीकडे, उद्धव ठाकरेंच्या रूपाने माजी मुख्यमंत्री शिवसेनेकडे आणि काँग्रेसकडे मात्र नेताच त्या उंचीचा उरला नाही. त्यामुळे पक्ष मोठा आणि नेते छोटे अशी काँग्रेसची अवस्था झाली.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक बैठकीनंतर काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीत कोणी मोठा किंवा कोणी छोटा नाही असे आवर्जून सांगू लागले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांना काँग्रेसची री सतत ओढावी लागली. एरवी काँग्रेसने आपण मोठा भाऊ आहोत कारण आपण राष्ट्रीय पक्ष आहोत असे सांगायला सुरुवात केली असती तर ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे नेते जास्त गुरगुरले असते आणि पवारांनी नेहमीप्रमाणे शांत बसत काड्या केल्या असत्या.


पण महाविकास आघाडी टिकवून धरायची असेल आणि भविष्यात सत्तेचा वाटा मिळवायचा असेल, तर काँग्रेसची वाढलेली संघटनात्मक ताकद आपल्यापासून दूर जाऊन चालणार नाही याची त्या दोघांनाही जाणीव झाली. त्यामुळे पवार आणि ठाकरे या दोघांच्याही पक्षांच्या नेत्यांना महाविकास आघाडीत कोणी मोठा किंवा कोणी छोटा नाही याची कबुली द्यावी लागली. त्यामुळे महाविकास आघाडीत तिळ्यांचे दुखणे निर्माण झाले आणि ते दुखणे मुख्यमंत्री होणार तरी कोण??, यावर अडून राहिले.

त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या टॉपच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत हेच कन्फ्युजन तयार झाले की आपण कुठलाच चेहरा पुढे न करता निवडणुकीला कसे सामोरे जायचे?? त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्यासारख्या चतुर नेत्याने थेट दिल्ली गाठून मुख्यमंत्रीपदाचा आपला खुंटा काँग्रेस नेत्यांमार्फत बळकट करण्याचा प्रयत्न चालविला. शरद पवार जर अदानी मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ शकतात, तर आपणही काही कमी नाही. आपण त्यांना वळसा घालून थेट काँग्रेस नेत्यांकडे जाऊ शकतो, हे उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात एका झटक्यात दाखवून दिले.

त्यामुळे महाविकास आघाडीत तिळ्यांचे दुखणे सुरू असतानाच ठाकरे आणि पवारांनी त्यांच्या राजकीय वकुबानुसार हालचाली सुरूच ठेवल्या. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करायचा नाही, पण निवडणुका मात्र रेटून लढवायचा हे महाविकास आघाडीने मनोज जरांगे यांच्या बळावर ठरवून टाकले. त्यामुळे भविष्यात महायुती हरली किंवा महाविकास आघाडी जिंकली किंवा महायुती आणि महाविकास आघाडीचे समसमान बळ तयार झाले, तर तिळ्यांच्या दुखण्यात मुख्यमंत्री होणार कोण आणि कुणाचा??, हा सवाल मात्र आ वासून पुढे उभा राहणार आहे. त्यावेळी पवारांनी आपल्या जुन्या सवयीनुसार आणि ठाकरेंनी 2019 मध्ये लागलेल्या सवयीनुसार कोलांटउडी नाही मारली, म्हणजे मिळवलीन्!!

MVA parties pointing fingers at each other as small party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात