नरेंद्र मोदी हे युक्रेनला पोहोचणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. पोलंडहून थेट रेल्वेने शुक्रवारी सकाळी ते कीव येथे पोहोचले, तेथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयात पोहोचले. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही भावूक होताना दिसत आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्धात मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
Prithviraj Chavan : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट; दोघांत बंद दाराआड चर्चा
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मारिन्स्की पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट झाली. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मारिन्स्की पॅलेस पूर्णपणे सजवण्यात आला होता. नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले. कीव येथे पोहोचल्यावर भारत माता की जय असा जयजयकार करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
येथे त्यांनी सुमारे 200 भारतीय नागरिकांची भेट घेतली. यावेळी मोदींची आपुलकी स्पष्टपणे दिसून आली. नरेंद्र मोदी हे युक्रेनला पोहोचणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कीव येथे पोहोचले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more