विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती किती सत्तालोलूप आहे, याचे प्रत्यंतर पवार आणि त्यांच्या चेल्यांच्या वक्तव्यातून नेहमी येतच असते. अजितदादा Ajit Pawar भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले, तर भाजपवर टीकास्त्र सोडायचे, पण अजितदादांवर टीकास्त्र सोडताना हातचे राखायचे, असले खेळ सुप्रिया सुळे, रोहित पवार आदी नेत्यांच्या वक्तव्यातून समोर येतातच.
भाजपने पक्ष आणि कुटुंब फोडणे गैर, पण त्या पक्षाने अजितदादांना मुख्यमंत्री केले, तर चालेल, असली वक्तव्ये सुप्रिया सुळे यांनी मध्यंतरी केली होती. आता तशाच आशयाचे वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदावरून हटवून ते गृहमंत्री पद थेट अजितदादांकडे सोपविण्याची मागणी केली. या त्याच विद्या चव्हाण आहेत, ज्यांच्या विरोधात सुनेचा छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.
MVA : महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागा वाटपात ठाकरे आणि काँग्रेस तोट्यात; पण पवारांची राष्ट्रवादी ना फायद्यात, ना तोट्यात!!
एकीकडे माझ्या हातात सत्ता द्या आणि 48 तासांत पोलिसांचे हात मोकळे करुन एका एकाला सुतासारखा सरळ करतो, असे आव्हान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस हे पार्ट टाईम गृहमंत्री आहेत अशी झोंबरी टीका केली असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी गृहमंत्री पद बदलण्याची मागणी केल्याने राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीची सत्तालोलूपता उघड्यावर आली.
हे फडणवीस यांचं काम नाही
गृहमंत्रीपद सांभाळणे हे देवेंद्र फडणवीस यांचं काम नाही. आता उरलेले काही महिने गृहमंत्रीपद अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे द्यावे. ते उत्तमपणे सांभाळतील. ते कडक स्वभावाचे आहेत. त्यांना ते चांगल जमेल किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्या ताब्यात गृहमंत्रालय घ्यावे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली. राष्ट्रवादी दोन्ही गटात फुट झाल्याने दोन्ही गटातील नेत्यांमधून विस्तव जात नसताना शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अजितदादांची तारीफ केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. पण त्याहीपेक्षा शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या सत्तालोलूपता सगळ्या महाराष्ट्राला दिसली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more