अंतरिम सरकारने हे मोठे पाऊल उचलले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. देश आणि पंतप्रधानपद सोडल्यानंतर त्यांच्या मागे अंतरिम सरकार आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शेख हसीना, त्यांच्या कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. अंतरिम सरकारच्या या निर्णयामुळे नेत्यांना व्हिसामुक्त देशांमध्ये प्रवास करता येणार नाही.
नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात खासदारांना दिलेले सर्व डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केले. यामध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि खासदारांच्या पासपोर्टचाही समावेश आहे. ज्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहेत त्यांना काही देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवासासह अनेक विशेषाधिकार मिळत असतात.
याबाबत गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अंतरिम सरकारने डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांना सामान्यतः लाल पासपोर्ट म्हणून ओळखले जाते, कारण हे लोक आता अधिकृत पदांवर राहिले नाहीत.
ते म्हणाले की, ते आता त्यांच्या पदावर राहणार नसल्याने त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, गृहमंत्रालयाने याप्रकरणी पासपोर्ट विभागाला केवळ तोंडी सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले. याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more