बस पोखराहून काठमांडूला जात असताना ही भीषण दुर्घटना घडली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नेपाळमध्ये ( Nepal) भारतीय बसला अपघात झाला. तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत बस पडली. बसमध्ये 40 भारतीय होते. नेपाळ पोलिसांनी सांगितले की, बस पोखराहून काठमांडूला जात होती.
तनहुन जिल्हा पोलिसांचे डीएसपी दीपकुमार राय यांनी सांगितले की, बसचा क्रमांक UPFT7623 आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 16 प्रवाशांना मदत आणि बचाव पथकाने वाचवले आहे.
मात्र, ते जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बस नदीत पडण्याचे कारणाचा स्थानिक पोलीस प्रशासन शोध घेत आहे. पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more