वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बांगलादेशात ( Bangladesh ) विद्यार्थी आंदोलनानंतर पीएम शेख हसीना यांचा राजीनामा आणि भारतात पलानयन केल्यामुळे तणाव वाढत आहे. आता पुराच्या मुद्द्यावरून भारत-बांगलादेश आमने-सामने आहेत. पूर्व आणि दक्षिण-पूर्व बांगलादेशातील अनेक जिल्ह्यांत पूरसंकट आहे. पुरस्थितीसाठी भारताला जबाबदार धरत बांगलादेशमध्ये भारतविरोधी आंदोलन सुरू झाले आहे. बांगलादेशी विद्यार्थी संघटनेनुसार, भारताचा ‘पूर बॉम्ब’ येथे पाणी साचण्यास कारणीभूत अाहे.
आंदोलनाचे केंद्र ढाका विद्यापीठ असून तेथे २१ ऑगस्टच्या रात्री सभा आयोजित केली. भारताने इशारा न देता बांगलादेशात नैसर्गिक आणि राजकीय पूर आणल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दुसरा एक विद्यार्थी म्हणाला, आम्ही १९७१ मध्ये जसे युद्ध लढले तसेच २०२४ मध्ये स्वातंत्र्यासाठी लढू.
बांगलादेशी विदेश मंत्रालय गप्प, मात्र राजदूतास बोलावले: पुराच्या मुद्द्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाकडून कोणतीही टीप्पणी केली नाही. ढाक्यात भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना मुख्य सल्लागार मोहंमद युनूस यांनी पाचारण केले. मात्र, यानंतर बांगलादेशचे विदेश मंत्रालय म्हणाले, हे समन्स नव्हे तर शिष्टाचार भेट आहे.
बांगलादेशी विद्यार्थी नेत्यांचा आरोप : पूर भारताचे षड्यंत्र
आरक्षण आंदोलनाचे समन्वय विद्यार्थी हसनत अब्दुल्ला म्हणाला, भारताने धरणातील पाणी सोडून बांगलादेशातील पुराचे कारण होत आहे. आम्ही एका नव्या राज्याच्या स्थापनेचे काम करत आहोत. एक शेजारी देशाच्या रूपात मदत करण्याऐवजी ते षडयंत्र रचत आहेत. दुसरीकडे, अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार नाहिद इस्लाम म्हणाले, वरील पाणी बांगलादेशपर्यंत पाेहोचत आहे आणि पूरस्थिती निर्माण केली आहे. कोणत्याही इशाऱ्याशिवाय धरणातील पाणी सोडले.
पाणी सोडल्याने पूर आल्याची बातमी चुकीची- भारत
भारत सरकारने गुरुवारी बांगलादेशात प्रकाशित वृत्तांचे खंडन केले आहे, ज्यात त्रिपुरातील गोमती नदीवरील धरणाचे दरवाजे उघडल्याने बांगलादेशात पूर आल्याचा दावा केला होता. भारतीय विदेश मंत्रालयाने सांगितले की, बांगलादेशमध्ये पुराचे मुख्य कारण धरणाखालील मोठ्या जलग्रहण क्षेत्रांतील(डाऊन स्ट्रीम) पाणी आहे.विदेश मंत्रालयानुसार, डंबूर धरण(बांगलादेश) सीमेपासून १२० किमीहून जास्त अंतरावर आहे. हे कमी उंचीचे धरण असून वीज निर्मिती करते आणि ती वीज ग्रिडमध्ये जाते. यामुळे बांगलादेशाला त्रिपुरातून ४० मेगावॅट वीज मिळते. २१ ऑगस्टला दुपारी ३ पर्यंत बांगलादेशला पुराचे आकडे पाठवले आहेत. सायं. ६ वाजता पुरामुळे वीज गायब झाली. यानंतरही आम्ही डेटाच्या तत्काळ माहितीसाठी अन्य माध्यमांतून माहिती व्यवस्था स्थापन्याचा प्रयत्न केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App