गुजरात: अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, कारमधील 10 जणांचा मृत्यू


आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले


विशेष प्रतिनिधी

नडियाद: गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाद शहराजवळ अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर बुधवारी एका भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याने कारमधील 10 जणांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.GUJARAT accident on Ahmedabad Vadodara expressway 10 dead

नडियाद ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरीट चौधरी यांनी सांगितले की, कार अहमदाबादहून वडोदऱ्याच्या दिशेने जात असताना एक्स्प्रेस वेवर ट्रकच्या मागील बाजूस धडकली. आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, त्यांचा नंतर मृत्यू झाला.”नडियादचे आमदार पंकज देसाई म्हणाले की, काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रक एक्स्प्रेस वेच्या डाव्या लेनवर थांबला आणि कार चालकाला ब्रेक लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि तो अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच द्रुतगती महामार्ग गस्ती पथकासह दोन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या. सध्या संबंधित विभाग या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

GUJARAT accident on Ahmedabad Vadodara expressway 10 dead

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात