विशेष प्रतिनिधी
मुंबई : Congress – shivsena मोठा भाऊ, छोटा भाऊ; एकमेकांनाच टोले लावू!!, असले युद्ध महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत रंगण्यापेक्षा महाविकास आघाडीतल्या शिवसेना विरुद्ध काँग्रेस असेच रंगले आहे. Congress – shivsena
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी महाविकास आघाडीत तिसरा भाऊ असणारा काँग्रेस पक्ष निकालानंतर एकदम पहिला म्हणजे थोरला भाऊ बनला. शिवसेना दुसरा म्हणजे धाकटा भाऊ झाला आणि पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसरा भाऊ झाला. महाविकास आघाडीत काँग्रेसचा जोर वाढला. त्यातून काँग्रेसने थेट मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला. पवारांना तो दावा सहन करावा लागला, पण शिवसेनेला तो सहन झाला नाही. Congress – shivsena
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी काँग्रेसला सुनावले. मोठा भाऊ – छोटा भाऊ असला वाद करण्यात मतलब नाही. शिवसेनेमुळे काँग्रेसच्या तीन जागा वाढल्या. म्हणून ते पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनले. याची आठवण त्यांना नसेल, तर आम्हाला त्यांना ती आठवण करून द्यावी लागेल, असा टोला राऊत यांनी हाणला. Congress – shivsena
Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निरंतर चालू राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राऊत यांना प्रतिटोला हाणला. संजय राऊत रोज काही ना काही तरी बोलतच असतात. त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका. महाविकास आघाडीतल्या जागा वाटपात सगळ्याच पक्षांचे फक्त वरिष्ठ नेते लक्ष घालत आहेत. ते तो तिढा सोडवतील. पण काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असे नाना पटोले म्हणाले.
त्यामुळे आधी संजय राऊत यांचे वक्तव्य आणि त्यानंतर नाना पाटोले यांनी दिलेले उत्तर यातून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मोठा भाऊ – छोटा भाऊ; एकमेकांनाच टोले लावू असले युद्ध रंगलेले दिसले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more