या प्रकरणात ३० हून अधिक आरोपी असून त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी प्रलंबित आहे. Lalu Prasad Yadav
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात ‘लँड फॉर जॉब’ घोटाळा प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सीबीआयने लालू यादव यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागितली आहे. गृह मंत्रालयाने यास मान्यता दिली आहे. शुक्रवारी सीबीआयने राऊस ॲव्हेन्यू कोर्टात मंजूर प्रतही सादर केली. Lalu Prasad Yadav
या प्रकरणात ३० हून अधिक आरोपी असून त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी प्रलंबित आहे. सीबीआयने अन्य आरोपींविरुद्ध मंजुरीसाठी आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. Lalu Prasad Yadav
Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निरंतर चालू राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सीबीआयला इतर आरोपींविरुद्ध मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया जलद करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more