विनायक ढेरे
नाशिक : Mahashaktiमहाराष्ट्रातल्या राजकारणात अशी एक तिसरी आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे, की जिच्या नेत्यांना “तिसरी आघाडी” हे नावच नकोसे वाटते आहे. ते “महायुती” आणि “महाविकास आघाडी” म्हणून पहिली – दुसरी आघाडी म्हणून आम्ही “तिसरी आघाडी” ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही, असे सांगून महायुतीच्या बळावर 2014 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत पोहोचलेले माजी खासदार राजू शेट्टी यांनी “परिवर्तन महाशक्ती” म्हणून तिसऱ्या आघाडीच्या दंडात बळ भरले. पण या परिवर्तन महाशक्ती या आघाडीतल्या सगळ्या नेत्यांच्या राजकीय इतिहासातील भूमिकांनी या महाशक्तीच्या अस्तित्वाविषयीच महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात दाट संशयाचे मळभ निर्माण झाले. Mahashakti
राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे पाटील, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्र येऊन पुण्यात पत्रकार परिषद घेऊन 26 सप्टेंबरच्या छत्रपती संभाजीनगरच्या मेळाव्याची घोषणा केली. त्यात त्यांनी मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर ज्योती मेटे यांच्याही सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.
पुण्यातल्या पत्रकार परिषदेत वरवर दिसायला ही नाव नाकारलेली “तिसरी आघाडी” परिवर्तन महाशक्ती दिसली. कारण या सगळ्या नेत्यांच्या पक्षांची नावे भरदार आहेत. स्वाभिमानी पक्ष, स्वराज्य पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र राष्ट्र समिती या नावांनी परिवर्तन महाशक्तीतले पक्ष आधीच सजले आहेत.
पण वर उल्लेख केल्याप्रमाणे सर्व नेत्यांचे राजकीय इतिहास त्यांच्या भविष्यातल्या राजकारणाविषयी संशयाचे दाट मळभ निर्माण करून गेली. राजकीय इतिहासात प्रत्येक टप्प्यावर या नेत्यांनी कुठे ना, कुठेतरी महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन आमदारकी, खासदारकी किंवा महामंडळ पदरात पडून घेतली, हे उघड सत्य परिवर्तन महाशक्तीच्या विश्वासार्हतेवर ठळक प्रश्नचिन्ह लावून गेले. Mahashakti
Donald Trump : मोदींचा अमेरिकेतही जलवा; डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचारादरम्यान म्हणाले…
– नेत्यांचे राजकीय इतिहास
वर उल्लेख केलेले नेते राजू शेट्टी 2014 मध्ये महायुतीच्या वळचणीला जाऊन लोकसभेत पोहोचले. विधान परिषद आमदारकी मिळवण्यासाठी त्यांनी शरद पवारांशी संधान बांधले. बारामतीच्या गोविंद बागेत जाऊन आमरस पुरीचे जेवण घेतले. पण त्यांना आमदारकी मिळू शकली नाही.
संभाजीराजे भाजप सरकारच्या शिफारशीवर राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले. देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांना रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष केले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्ष संघटना बाजूला ठेवून शाहू महाराजांसाठी काँग्रेसचा प्रचार केला. Mahashakti
मनोज जरांगे परिवर्तन महाशक्तीत सामील होणार की नाही हा भाग अलाहिदा पण त्यांच्या आंदोलनाचे “मास्टरमाईंड” कोण??, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ज्या आघाडीत मनोज जरांगे जातील, त्या आघाडीत आपण जाणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी आधीच जाहीर केले आहे. पण प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जायचा प्रयत्न केला होता, तो यशस्वी झाला नाही, हा इतिहास फार जुना नाही. एप्रिल – मे 2024 चा आहे. त्या आधी देखील तो 1998 मध्ये काँग्रेस आघाडीत जाऊन त्यांनी लोकसभेची खासदारकी मिळवली होतीच. पण नंतर शरद पवारांच्या राजकारणाचा “अनुभव” घेऊन ते काँग्रेस – राष्ट्रवादीपासून कायमचे बाजूला झाले होते. Mahashakti
वामनराव चटप, शंकरअण्णा धोंडगे हे तिसऱ्या आघाडीचे पूर्वी घटक होतेच, पण काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन त्यांनी आमदारकी मिळवली होती. आणि आता ते तसेही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाच्या परिघाबाहेरचे घटक आहेत.
त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी “तिसरी आघाडी” हे नाव नाकारून “परिवर्तन महाशक्ती” नाव घेतले असले, तरी तिच्या दंडात विश्वासार्हतेचे बळ कसे भरणार??, महाराष्ट्रात विधानसभेसाठी उमेदवार उभे करून ते स्वतः निवडून येणार की इतरांना पाडण्यासाठी मदत करणार??, हे लाख मोलाचे सवाल आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more