युपीत गुंड माफियांवर बुलडोझर चालवतोय बाबा; महाराष्ट्रात मात्र नेत्यांच्या स्वागताला जेसीबी घेऊन धावा!!


नाशिक : युपीत गुंड माफियांवर बुलडोझर चालवतोय बाबा, महाराष्ट्रात मात्र नेत्यांच्या स्वागताला जेसीबी घेऊन धावा!!, अशी स्थिती आहे.Yogi uses bulldozers to destroy mafia raj in UP, but in maharashtra leaders use them in welcome rallies

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ त्यांच्या गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करण्याच्या स्टाईलमुळे बुलडोझर बाबा म्हणून ओळखले जातात. अतिक अहमद, मुख्तार अन्सारी यांच्यासारख्या गुंड माफियांना आणि त्यांच्या चेले चपाट्यांना योगी आदित्यनाथांनी बुलडोझरची धडक कारवाई करून वठणीवर आणले. इतकेच नाही, तर यूपीतले गुंडाराज योगींनी बुलडोझर कारवाया करून उद्ध्वस्त करून टाकले.योगींच्या बुलडोझरची कायदेशीर दहशत संपूर्ण उत्तर प्रदेशात पसरली आणि त्यांची कॉपी मध्य प्रदेशातल्या मामांनी केली. मध्य प्रदेशात देखील काही गुंड माफियांवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुलडोझर कारवाई केली. त्यांची बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त केली.

पण महाराष्ट्रात मात्र हे बुलडोझर अजूनही प्रत्यक्ष कारवाई ऐवजी नेत्यांच्या स्वागतासाठी वापरले जात असल्याचे चित्र आहे. नेत्यांच्या गावांमध्ये स्वागत करताना बुलडोझर, क्रेन यांच्याद्वारे गुलाल उधळतात. हार घालतात. हे चित्र महाराष्ट्रात अजित पवार, धनंजय मुंडे वगैरे नेत्यांच्या बाबतीत दिसले.

याला अपवाद म्हणून मध्यंतरी माहीम मध्ये बेकायदा दर्ग्यावर आणि एप्रिल 2023 मध्ये मालाड मध्ये बेकायदा झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालवून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडक कारवाई केली. पण असा एखाद दुसरा अपवाद वगळता महाराष्ट्रात तरी बुलडोझरचा खरा प्रताप दिसलेला नाही.

 जेसीबी आणून नेत्यांची “दादागिरी”

त्याउलट आपलेच नेते कसे “दादा” आहेत, त्यांची “दादागिरी” कशी सगळ्या महाराष्ट्रावर चालते हे दाखवण्यासाठीच बुलडोझरचा वापर गुलाल उधळायला आणि हार घालायला नेते करत आहेत. बारामतीच्या अजित पवारांच्या कालच्या सभेत त्यांना क्रेनने हार घातला. फुले उधळली. धनंजय मुंडे यांचेही तसेच काही दिवसांपूर्वी स्वागत झाले होते. महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय कल्चर मधले नेते स्वतःची “दादागिरी” सिद्ध करण्यासाठी छोट्या मोठ्या सभांमध्ये बुलडोझर, जेसीबीचा वापर करून स्वागत करताना दिसतात.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोली सभा होत असताना विमानतळावर त्यांच्या स्वागताला 21 जेसीबी आणण्यात आले. पण पोलिसांनी ते परत पाठवले. पण उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातही बुलडोझरचा खरा प्रताप दिसलाच नाही. पण त्यांच्या शिवसेनेची “दादागिरी” दाखवण्यासाठी त्यांच्या स्वागताला मात्र 21 जेसीबी हजर करण्यात आले होते, हे नजरेआड करून चालणार नाही. पण त्यापलीकडे बुलडोझरचा वापर करून गुंड माफियांना खरी कायदेशीर दहशत बसवायची असते हे मात्र महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या कुवतीपलीकडचे दिसत आहे!!

Yogi uses bulldozers to destroy mafia raj in UP, but in maharashtra leaders use them in welcome rallies

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात