विशेष प्रतिनिधी
कोलकता – नारद भ्रष्टाचार प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या चार नेत्यांना अटक केली. पण भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या सुवेंदू अधिकारी यांना अटक का झाली नाही, असा सवाल हे ‘स्टिंग ऑपरेशन’ घडवून आणलेल्या नारद न्यूज पोर्टलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मॅथ्यू सॅम्युअल यांनी केला आहे. Why not arrest Suvendu Adhikari in to Narada scam case
‘सीबीआय’ ने पक्षपात न करता यात अडकलेल्या सर्व नेत्यांवर कारवाई करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. स्टिंग ऑपरेशनमधील आवाजाची न्यायवैद्यक चाचणी केल्यानंतर तो आवाज स्वतःचा असल्याची कबुली अधिकारी यांनी दिली होती, असे मॅथ्यू यांनी सांगितले. मुकुल रॉय यांच्या सूचनेवरून मॅथ्यू यांच्याकडून पैसे स्वीकारल्याची माहिती त्यानवेळी एका आयपीएस अधिकाऱ्याने दिली होती. तरीही ‘सीबीआय’ने रॉय यांना अभय दिल्याने मॅथ्यू यांनी आश्च्र्य व्यक्त केले.
नारद स्टिंग ऑपरेशनमधील गैरव्यवहार हा मार्च २०१६ मधील विधानसभा निवडणुकीवेळचा आहे. नारद न्यूज पोर्टलचे ‘सीईओ’ मॅथ्यू सॅम्युअल यांनी निवडणुकीआधी व्हिडिओ चित्रफीत प्रसारित करीत पश्चि२म बंगालच्या राजकारणाला हादरे दिले होते. या चित्रफीत ते एका कंपनीचे प्रतिनिधीच्या रूपात दिसले. तृणमूल काँग्रेसचे सात खासदार, तीन मंत्री आणि कोलकता महानगरपालिकेचे महापौर सोवन चॅटर्जी यांना कामाच्या बदल्यात ते मोठी रक्कम देत असल्याचे आढळून आले होते.
भ्रष्टाचाराचे हे प्रकरण ‘सीबीआय’ पर्यंत पोचू नये, यासाठी तृणमूल काँग्रेसने सर्व उपाय केले. हे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोपही केला, पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारविरोधात निकाल निकाल दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App