“कमळाबाई” ते “सापाचं पिल्लू” ;उद्धव साहेब, ठोकताय कुणाला??, भाजपला की आपल्याच वडिलांना??


सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय, एनआयए असल्या केंद्रीय तपास संस्थांच्या चौकशी आणि तपासांनी हैराण झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री रामटेक वरल्या स्नेहभोजनाच्या वेळी जोरदार “राजकीय हवा” भरण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी आपल्याकडची भरपूर शब्दसंपत्तीची उधळून आपल्या राजकीय शत्रुला ठोक ठोक ठोकले…!! भाजपच्या नेत्यांना त्यांनी “सापाचं पिल्लू” म्हणून घेतले. आम्ही घाबरत नाही. छापे सहन करणार नाही, वगैरे वगैरे दमबाजी देखील त्यांनी केली… पण ती कोणाला??, uddhav thackeray speech on ramtek about bjp and ED

फक्त भाजपवाल्यांना की आणखी कोणाला…?? उद्धव साहेबांनी आपल्या भाषणात भाजपवाल्यांना “सापाचं पिल्लू” म्हणून घेतलं. गेली 30 वर्ष सापाच्या पिल्लाला दूध पाजलं. ते आता वळवळ करतंय, असं ते म्हणाले… 30 वर्ष आणि सापाच्या पिल्लाला दूध… हो… पण कोणी पाजलं…?? आपण ज्याला दूध पाजतो तो साप आहे, हे गेल्या 30 वर्षात कळलं नाही…??… आणि हो… “कमळाबाई”चे रूपांतर “सापाच्या पिल्ला”त कधी झालं…??, हे लक्षात आलं नाही…?? कुणाच्या लक्षात आले नाही…?? मुख्यमंत्री उद्धव साहेब, तुमच्या की आपले वडील बाळासाहेबांच्या…??बाळासाहेबांच्या वेळी ती “कमळाबाई” होती आणि आता एकदम “सापाचं पिल्लू”…!! बरं ते “सापाचं पिल्लू” आहे, तर ते बाळासाहेबांना कळलं नव्हतं…?? कारण 30 वर्षातली 20 पेक्षा जास्त वर्ष तर बाळासाहेबांचीच होती…!! उरलेली 5 – 10 वर्ष उद्धव साहेब, तुमची होती… मग “कमळाबाई”चे रूपांतर 20 वर्षात “सापाच्या पिल्ला”त झालेले बाळासाहेबांना कळलं नाही…??, की नंतरच्या 5 – 10 वर्षात उद्धव साहेब, तुम्हाला कळलं नाही…??

सर्वसाधारण पत्रकारिता शिकवताना बातमी आणि साप आपल्या खिशात ठेवू नये, असे असे शिकवले जाते. बाळासाहेब हे सामना आणि मार्मिकचेही संपादक होते. म्हणजे ते वरिष्ठ पत्रकार होते. पत्रकारांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. मग त्यांनी “सापाची पिल्लं” आपल्या खिशात कशी ठेवली…?? त्यानंतर त्यांनीच नेमलेल्या आणि आत्ताही असलेल्या कार्यकारी संपादकांनी “सापांच्या पिल्लांची” अनेकदा भलामण सामनाच्या अग्रलेखातून केली होती… मग तेव्हा त्यांनाही कळले नव्हते का, की साप खिशात ठेवू नये म्हणून…!!

नेमकं काय झालंय उद्धव साहेब…?? की तुम्ही एवढे चिडलाय… भडकलाय… संतापलाय… रागावलाय…!! असं काय केलंय कमळाबाईनं की तिचे रूपांतर उद्धव साहेब, तुम्ही एकदम “सापाच्या पिल्ला”त करून टाकलंत…??

…बरं मान्य… ईडी, सीबीआय, एनआयए या केंद्रीय तपास संस्था भाजपच्या हातात आहेत. पण मग “कमळाबाई”ला एकदम “सापाचं पिल्लू” म्हणून त्यांचे छापे बंद होणार आहेत का…?? उद्धव साहेब म्हणाले, आम्ही छापे सहन करणार नाही…!! बरं नका करू… पण मग करणार काय…?? ईडी, सीबीआयला धडा कसा शिकवणार…?? त्यांच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात अटकाव करणार की आणखी काही…?? कारण सामनाच्या कार्यकारींनी तर थेट “सापाच्या पिल्लां”च्या मालकांनाच पत्र पाठवले आहे, की तुमच्या तपास संस्थांना आवरा म्हणून…, मग आवरतील का “सापाच्या पिल्लां”चे मालक केंद्रीय तपास संस्थांना…??

उद्धव साहेब, तुम्ही भाजपला “सापाचं पिल्लू” म्हणून आपल्याच वडिलांची निंदा तर नाही ना केली…?? नाही तर “सापाच्या पिल्ला”च्या शेपटावर पाय ठेवून आणखीनच त्याला डिवचलं नाही ना…?? आणि तुम्ही त्याला डिवचलं असेल, तर मग तो भडकल्यावर डंख मारल्याशिवाय राहील की रस्त्याच्या कडेने निघून जाईल…?? नेमकं काय अपेक्षित आहे, तुम्हाला…??… की ही नुसतीच आदळआपट होती…??

आणि खरं म्हणजे, उद्धव साहेब, अजून ईडी, सीबीआय हे तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या मागे लागलेलेचं नाहीएत… सध्या ते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे लागलेत. राष्ट्रवादीवाल्यांना त्यांनी “आत” टाकलंय… त्यांना आधी “बाहेर” काढायचं बघितलं पाहिजे… की… भाजपवाल्यांना “साप” म्हणून डिवचून तुम्हाला ईडी, सीबीआयला राष्ट्रवादीवाल्यांच्या मागं लावायचं…?? तुम्हाला नेमकं काय करायचंय ते एकदा ठरवा… म्हणजे मग आपल्या सरकारमध्ये फुकाचा दम भरायची वेळ रामटेक मधल्या स्नेहभोजनात नाही यायची…!!

uddhav thackeray speech on ramtek about bjp and ED

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय