भारतीय अभिनेत्री झाली अमेरिकन सैन्यात भरती


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : भारतीय वंशाची तमिळ चित्रपट अभिनेत्री अकिला नारायणन अमेरिकेच्या सशस्त्र दलात सामील झाली आहे. अकिला नारायणन यांनी अमेरिकन सैन्यात वकील म्हणून रुजू झाल्या आहेत. गेल्या वर्षी दिग्दर्शक अरुलच्या कदमपरी या हॉरर थ्रिलरमधून तमिळमध्ये पदार्पण करणारी अकिला नारायणन आता अमेरिकी आर्मीमध्ये भरती झाली आहे.Indian actress enlists in US Army

सशस्त्र दलात प्रवेश करण्यासाठी अकिलाला अमेरिकी लष्कराचे कठोर लढाऊ प्रशिक्षणही घ्यावं लागलं आहे. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच ती अमेरिकी सैन्यात वकील म्हणून रुजू झाली.अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या अभिनेत्रीने २०२१ साली प्रदर्शित झालेल्या कादमपरी चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिदीर्ला सुरुवात केली.विशेष म्हणजे अकिला नाइटिंगेल स्कूल ऑफ म्युझिक नावाची ऑनलाइन म्युझिक स्कूलही चालवत आहे. यामध्ये ती अनेकांना तिच्याकडे असलेली संगीताची कला शिकवते. याशिवाय तरुण समाजाला प्रेरणा देण्यासाठी अकिला समाजात फिरत आहे.

अकिला नारायणन अमेरिकी लष्करी कर्मचाºयांची कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिल. ती देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती झाली आहे. अनेकांनी त्यांच्या सेवेचे कौतुक केले असून त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.

Indian actress enlists in US Army

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय