सापाच्या पिल्ला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

मुंबई: सापाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, आता ते वळवळ करत आह. केंद्रीय तपास यंत्रणांच्या सततच्या छाप्यांमुळे आपण दबून न जाता आक्रमकपणे तोंड देऊ, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.We have been feeding milk to snake for 30 years, Chief Minister Uddhav Thackeray’s attack on BJP

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांशी त्यांनी संवाद साधला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यानंतर येथे बैठकही घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.ठाकरे म्हणाले, माझे तुम्हाला आव्हान आहे की माझे १७० मोहरे तुमच्या गोटात घेऊन दाखवा आणि सरकार पाडून दाखवा. तुमच्यात हिम्मत असेल तर दाऊदला पकडून दाखवा, छापे कसले टाकता. आता हे छापे बंद करा, आघाडी सरकार हे छापे आता खपवून घेणार नाही.

We have been feeding milk to snake for 30 years, Chief Minister Uddhav Thackeray’s attack on BJP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण