खात्याविषयी प्रश्न आल्यास जेलमध्ये स्क्रिन लावणार का? प्रवीण दरेकर यांचा सवाल


विशेष प्रतिनिधी

ठाणे: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत. सत्तेवर असलेली नेतेमंडळी त्यांचा राजीनामा घेत नाही, मग अधिवेशनात त्यांच्या खातेविषयी काही प्रश्न समोर आले, तर मग काय त्यांच्यासाठी जेलमध्ये स्क्रीन लावणार का? असा सवाल भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.Will there be a screen in the jail if there is a question about the ministry? Question by Praveen Darekar

दरेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे हुकूमशाही पद्धतीने आणि अहंकाराने भरलेले सरकार आहे. बॉम्ब स्फोटातील दाऊदच्या संबंधातील आरोपी शहावली खान आणि सलीम पटेल त्यांच्याकडून ३०० कोटीची जागा १०-१५ लाखाला विकत घेऊन नवाब मलिक यांचा संबंध आला आहे.हा प्रकार गंभीर असून हा प्रश्न राष्ट्रवादाचा आहे. ज्याठिकाणी देश विघातक प्रवृत्ती येतात तेव्हा ‘झुकेगा नही’ अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे या सरकारचा आहे.राज्य सरकारकडून रोज एकच आरोप केला जात आहे. परंतु, कारवाई चुकीची की बरोबर हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून तो न्याय व्यवस्थेला आहे.

त्यामुळे न्यायालयीन कोठडीचे आदेश हे न्यायालयाने मालिकांना दिले असून भाजपने ते दिलेले नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणा या कोणाच्या इशाऱ्यावर चालत नसतात. जेव्हा कॉंग्रेस सरकार होते त्यावेळी देखील अशा प्रकारे मंत्र्यांवर कारवाई झाल्या. धाडी पडल्या. मग त्यावेळी आम्ही काय केले? मग आता तुमच्यावर जे आरोप होतायत त्याचे उत्तर जनतेला आणि न्यायालयाला द्या,

त्याचे खापर केंद्र सरकार, तपास यंत्रणा आणि भाजपवर कशाला फोडता?, असा सवाल दरेकर यांनी केला.लवकरच अधिवेशनाला सुरुवात होणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थित नवाब मलिक यांना आम्ही राजीनामा देण्यासाठी भाग पाडणार असल्याचा इशारा देत दरेकर म्हणाले, जर नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत.

त्यांच्याकडे कॉबिनेट मंत्री पद आहे. भाजप विरोधी पक्षात आहे आम्ही प्रश्न विचारला तर नवाब मलिक याचं उत्तर कुठून घ्यायचं. आमचे उत्तर मिळवण्यासाठी आम्ही जेल मध्ये जायचं की जेलमध्ये स्क्रीन लावणार का? नवाब मलिक यांच्या खात्यांच्या प्रश्नांची जबाबदारी कोण घेणार?

Will there be a screen in the jail if there is a question about the ministry? Question by Praveen Darekar

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण