पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्या ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाण्याची योजना ठरली. हे चारही मंत्री विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी समन्वय साधण्याचं काम पार पाडत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगाची (Operation Ganga) सुरुवात केली . आता ही मोहीम अधिक जलदगतीनं राबवण्यासाटी मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पोहचले आहेत . त्यापैकी, नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानियाच्या बुखारेस्ट येथे पोहोचले त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला त्यांच्या धाडसच कौतुकही केलं. विशेष म्हणजे यावेळी भेटलेल्या मराठमोळ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट मराठीतून संवाद साधला तेव्हा पुणे सांगली आणि चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांना कोण आनंद झाला हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते …हा व्हिडिओ व्हायरल झाला असून मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक होत आहे …MINISTERS IN WAR ZONE: Bucharest-Main Pune Se Hu … as soon as she said …Jyotiraditya Shinde started the conversation in Marathi
https://twitter.com/ANI/status/1498966078420295681?s=20&t=mtWEFaNsug3S3iX2Z2j9VQ
त्यापैकी ज्योतिरादित्य शिंदे हे बुखारेस्टला पोहोचले असून त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली. येथे, त्यांना पुणे, चंद्रपूर आणि सांगलीतील विद्यार्थी भेटले.
चंद्रपूरमधील एका विद्यार्थ्याने मी महाराष्ट्राचा असल्याचे सांगताच, मग मराठीतून बोलणारे बाबा… असे म्हणत त्याच्याशी मराठीतून संवाद साधला. तसेच, कुठल्या जिल्ह्यातून आला हेही विचारपूस केली. काळजी करू नका, भारत सरकार तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वासही दिला.
मी पुण्याची असं सांगताच माझे वंशज पुण्याचे असे म्हणत त्यांनी वानवडी ्चाउल्लेख करत विद्यार्थीनीला धीर दिला. काहीही काळजी करू नका, आपल्या जेवणाची सोय झालीय ना, तुम्हा सर्वांना घेऊन आपण मायदेशी जाणार आहोत, असा विश्वास ज्योतिर्रादित्य यांनी दिला.
सांगलीच्या मुलीशीही मराठीत संवाद साधला. मी तुमच्या सांगलीला निवडणूक प्रचारात आलो होतो, तेथले आमदार कोण आहेत, खासदार कोण आहेत, असे प्रश्न शिंदेंनी त्या मुलीला विचारले. यावेळी, शिंदेंना पाहून अनेकांना मोठा आधार मिळाला.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह हे युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी समन्वय कार्यासाठी हजर आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App