गुपकार – भाजपमध्ये काश्मीरमध्ये जबरदस्त टक्कर; डीसीसी निवडणूकीतील पहिले कल


  • गुपकार ६४, भाजप ४७, काँग्रेस १९, अपक्ष ४३

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : ‘डीडीसी’च्या निवडणुकीत फारूख अब्दुल्ला – मेहबूबा मुफ्ती यांचा गुपकार गट आणि भाजप यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळत आहे. दुपारी १२.३० पर्यंत २८० जागांपैकी १७४ जागांचे कल हाती आले तेव्हा गुपकार गट ६४ जागांवर तर भाजप ४७ जागांवर तसेच काँग्रेस १९ जागांवर आघाडी घेतली आहे.

अन्य अपक्ष आणि छोट्या पक्षांचे ४३ जागांवर आघाडी आहे. काश्मीर खोऱ्यात भाजप समर्थित १२ उमेदवार आघाडीवर आहेत. २० जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक झाली. मतदान बॅलेट पेपरवर झाले आहे. त्यामुळे निकाल सावकाश लागत आहेत. tough fight between gupkar and bjp in jammu – kashmir ddc elections

  • २४० जागा, ग्रामपंचायतींच्या सुमारे तेरा हजार जागा आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २४० पोटनिवडणुका झाल्या आहेत.
  • ७२ वर्षांत प्रथमच वाल्मिकी समाज, गोरखा समाज आणि पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींना मतदानाचा अधिकार मिळाला. मूळच्या जम्मू काश्मीरमध्ये जन्मलेल्या, पण विवाह जम्मू काश्मीरबाहेर केलेल्या लेकींचाही हक्क माहेर डावलत होते. या चार समाजघटकांना मतदानासारखा अत्यंत मूलभूत हक्क आतापर्यंत नाकारला गेला आणि तो ही तथाकथित लोकशाहीवाद्यांकडून. या लाखो लोकांनी प्रथमच मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे.
  • याशिवाय १५ वर्षांपासून रहिवाशी असलेले कोणीही व्यक्ती प्रथमच मतदान करेल. कारण ३७० कलम रद्द झाल्यानंतर अनेक दशके जम्मू काश्मीरमध्ये राहणारया या समाजघटकांना रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाइल) मिळाले आहे. आणि, ते भारताबरोबरच ‘जम्मू काश्मीरचेही नागरिक’ बनले आहेत.

tough fight between gupkar and bjp in jammu – kashmir ddc elections

  • आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अब्दुल्ला आणि नुसती कुटुंबीयांनी एकत्र येऊन चीन पाकिस्तानच्या मदतीने 370 कलम पुन्हा लागू करण्याची दर्पोक्ती केली होती. तिला राज्यातील मतदारांनी भरघोस मतदान करून चोख प्रत्युत्तर दिले आहे त्याचा आज निकाल आहे.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात