काश्मीरमध्ये जबरदस्त टक्कर; भाजप ६६ गुपकार ६२, काँग्रेस २५, अपक्ष ७०


  • डीडीसी २८० जागांपैकी २२३ जागांचे कल हाती

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : ‘डीडीसी’च्या निवडणुकीत फारूख अब्दुल्ला – मेहबूबा मुफ्ती यांचा गुपकार गट आणि भाजप यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळत आहे. दुपारी १.३० पर्यंत २८० जागांपैकी २२३ जागांचे कल हाती आले तेव्हा गुपकार गट ६२ जागांवर तर भाजप ६६ जागांवर तसेच काँग्रेस २५ जागांवर आघाडी घेतली आहे. अन्य अपक्ष आणि छोट्या पक्षांचे ७० जागांवर आघाडी आहे. काश्मीर खोऱ्यात भाजप समर्थित १२ उमेदवार आघाडीवर आहेत. २० जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक झाली. मतदान बॅलेट पेपरवर झाले आहे. त्यामुळे निकाल सावकाश लागत आहेत.

bjp surpasses gupkar group in ddc election results, bjp 66, gupkar 62, congress 25

काश्मीर खोऱ्यात जेथे भाजपला कधीही संधी मिळालेली नाही तेथे ६० पैकी २४ भाजप समर्थक उमेदवार आघाडीवर आहेत. काही ठिकाणी छोट्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तेथे भाजपने या उमेदवारांचा प्रचार केला आहे

२४० जागा, ग्रामपंचायतींच्या सुमारे तेरा हजार जागा आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २४० पोटनिवडणुका झाल्या आहेत.

bjp surpasses gupkar group in ddc election results, bjp 66, gupkar 62, congress 25

७२ वर्षांत प्रथमच वाल्मिकी समाज, गोरखा समाज आणि पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींना मतदानाचा अधिकार मिळाला. मूळच्या जम्मू काश्मीरमध्ये जन्मलेल्या, पण विवाह जम्मू काश्मीरबाहेर केलेल्या लेकींचाही हक्क माहेर डावलत होते. या चार समाजघटकांना मतदानासारखा अत्यंत मूलभूत हक्क आतापर्यंत नाकारला गेला आणि तो ही तथाकथित लोकशाहीवाद्यांकडून. या लाखो लोकांनी प्रथमच मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात