इराकमध्ये जन्मलेल्या बाळाला तीन गुप्तांग, वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना

इराकमधील मोसूल या शहरात अत्यंत विचित्र घटना घडली आहे. एका मुलाला तीन गुप्तांग असल्याचे दिसून आले आहे. तीन महिन्यांच्या या मुलाला तीन गुप्तांग असल्याने वैद्यकीय तज्ज्ञही चक्रावून गेले आहेत. Three genitals to a baby born in Iraq, a rare event in medical history


विशेष प्रतिनिधी

बगदाद: इराकमधील मोसूल या शहरात अत्यंत विचित्र घटना घडली आहे. एका मुलाला तीन गुप्तांग असल्याचे दिसून आले आहे. तीन महिन्यांच्या या मुलाला तीन गुप्तांग असल्याने वैद्यकीय तज्ज्ञही चक्रावून गेले आहेत.

तीन गुप्तांग असलेल्या एका मानवी बाळाचा जन्म येथे झाला आहे. कुटुंबियांना जन्माच्या तीन महिन्यानंतर बाळाला तीन शिश्न असल्याचे समजले. या तिन्ही शिश्नांपैकी एकच शिश्न कार्यरत होते. अन्य दोन शिश्नांमध्ये मूत्रमार्ग अथवा मलमूत्र नलिका नव्हती. त्यामुळे या दोन शिश्नातून मूत्र शरिराबाहेर पडण्याची प्रक्रिया होणार नव्हती. वैद्यकीय तपासानंतर डॉक्टरांनी दोन अतिरिक्त शिश्नांना शस्त्रक्रिया करून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे.

स्थानिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, तीन शिश्न असलेला अथवा ट्रिपहेलियाची ही पहिलीच घटना आहे. बाळाच्या कुटुंबियांमध्ये कोणताही अनुवांशिकपणा नसल्याचे समोर आले आहे. बाळ गर्भात असताना औषधांचा योग्य परिणाम न झाल्यामुळे त्याला तीन शिश्न आली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जवळपास एक वर्ष फॉओअप घेतल्यानंतर बाळाला आता कोणतीही समस्या नसल्याचे सांगण्यात आले आहे

Three genitals to a baby born in Iraq, a rare event in medical history


महत्त्वाची बातमी

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*