Supreme Court adjourns probe into CM Yeddyurappa corruption case

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीएम येदियुरप्पांच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती

CM Yeddyurappa : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 24 एकर सरकारी जागेचा समावेश असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बीएस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध दहा वर्षे जुन्या अवैध जमीन घोटाळ्याची सुनावणी घेण्यास विशेष कोर्टाने नकार दिला होता. मात्र, कर्नाटक हायकोर्टाने हा निर्णय उलटवला होता. आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा या खटल्याच्या चौकशीला स्थगिती दिली आहे. Supreme Court adjourns probe into CM Yeddyurappa’s corruption case


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 24 एकर सरकारी जागेचा समावेश असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बीएस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध दहा वर्षे जुन्या अवैध जमीन घोटाळ्याची सुनावणी घेण्यास विशेष कोर्टाने नकार दिला होता. मात्र, कर्नाटक हायकोर्टाने हा निर्णय उलटवला होता. आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा या खटल्याच्या चौकशीला स्थगिती दिली आहे.

21 मार्च रोजी येडियुरप्पा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. येडियुरप्पा यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाची दखल घ्यावी आणि 2012 मध्ये लोकायुक्त पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे कारवाई करावी, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने विशेष कोर्टाला निर्देश दिले होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर 24 एकर सरकारी जागेच्या बेकायदेशीर वाटपात सामील असल्याचा आरोप आहे, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची चौकशी थांबवून त्यांना दिलासा दिला आहे.

Supreme Court adjourns probe into CM Yeddyurappa’s corruption case

महत्त्वाची बातमी

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*