मी एका पायावर बंगाल जिंकेन, दोन्ही पायांवर दिल्ली जिंकेन; ममता बॅनर्जींचा हुगळीच्या सभेत दावा


वृत्तसंस्था

हुगळी – मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि दुसऱ्या पायावर दिल्ली जिंकेन, असा अजब दावा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हुगळी जिल्ह्यातील देवानंदपूर येथे केला. I will win Bengal on one leg and in the future, will get victory in Delhi on two legs: West Bengal CM and TMC leader Mamata Banerjee in Debanandapur, Hooghly

भाजपच्या उमेदवार निवडीवर देखील ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या की ज्या पक्षाला स्वतःचे स्थानिक कार्यकर्ते तयार करता आले नाहीत ते बंगालमध्ये येऊन निवडणूक लढवत आहेत. तृणमूळ काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केडर फोडून भाजपने उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यांच्या नेत्यांना साधा सोनार बांगला हे शब्द देखील नीट उच्चारता येत नाहीत. ते बंगालमध्ये होज पाइपमधून पाणी वाहते तसा पैसा वाहावत आहेत. पण एवढे करूनही ते बंगाल जिंकू शकत नाहीत. मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि दोन्ही पायांनी दिल्ली जिंकून दाखवेन.



ममतांच्या पायाला नंदीग्राममध्ये निवडणूकीच्या सुरूवातीलाच दुखापत झाली आहे. त्यांचा पाय प्लॅस्टरमध्ये आहे. त्या व्हिलचेअरवर बसून प्रचार मोहिमेत सहभागी होतात. त्याचा संदर्भ देत त्यांनी एका पायावर बंगाल जिंकण्याचे विधान केले. आणि दुसरा पाय बरा झाला की दोन्ही पायांवर उभे राहून दिल्ली जिंकण्याची भाषा केली.

बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची गरजच काय होती?, एवढी कोविडची महामारी चालू असताना कमीत कमी वेळात निवडणूक प्रक्रिया संपवता आली असती. पण भाजपच्या मंडळींनी ही निवडणूक मुद्दाम लांबविली. त्यांना इतर पक्ष फोडण्यासाठी, प्रचारासाठी आणि निवडणूकीत गैरप्रकार करण्यासाठी जास्त वेळ हवा होता, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

I will win Bengal on one leg and in the future, will get victory in Delhi on two legs: West Bengal CM and TMC leader Mamata Banerjee in Debanandapur, Hooghly

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात