Home Minister Anil Deshmukh finally resigns, decision after High Court orders CBI probe

मोठी बातमी : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा, 100 कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणाची होणार CBI चौकशी

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर हायकोर्टा सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. Home Minister Anil Deshmukh finally resigns, decision after High Court orders CBI probe


विशेष प्रतिनिधी

मुंबई : परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर हायकोर्टा सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. नैतिकतेच्या आधारे का होईना गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

सिल्व्हर ओकवर झाला निर्णय…

हायकोर्टाच्या आदेशानंतर जवळजवळ अर्धा-पाऊण तास सिल्व्हर ओकवर बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले आहे.

राजीनाम्यात काय म्हणाले अनिल देशमुख

अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर  आपल्या राजीनाम्याचे पत्र पोस्ट केले आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिले आहे की, मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये आज दिलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रारीवर सीबीआय मार्फत चौकशी होणार आहे. त्यामुळे गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृ़ष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून राजीनामा देत आहे, असे लिहिले आहे.

 

 

देवेंद्र फडणवीस आक्रमक

तत्पूर्वी पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आतातरी राजीनामा द्यायला पाहिजे. चौकशीनंतर जर ते निष्पक्ष आढळले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे. परंतु आता नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना हटवले पाहिजे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक प्रतिमेला कलंकित करणारा हा सर्व प्रकार आहे. सीबीआय चौकशीद्वारेच सर्व सत्य समोर येऊ शकेल.

मुख्यमंत्र्यांचे अद्यापही मौन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, राज्यात एवढे गंभीर प्रकार घडत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावर चकार शब्दही काढला नाही. त्यांनी विधानसभेत एक प्रकारे आरोपी सचिन वाझेंचा बचावच करण्याचा प्रयत्न केला. ही सर्वात आश्चर्याची बाब आहे. मग गप्प राहून या सर्व प्रकारांना मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद द्यायचा आहे का, हा आमचा सवाल आहे. या सर्व प्रकारणाचे सर्व ऑपरेटर्स आणि हँडलर्स हे सरकारमध्ये बसले आहेत. यातील राजकीय हस्तक्षेप जोपर्यंत बाहेर येणार नाही, तोपर्यंत सत्य समोर नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा ही शरद पवार आणि सरकारचीही नैतिक जबाबदारी असल्याचा पुनरुच्चारही फडणवीसांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*