मतदारांना कमी लेखू नका, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावर शरद पवार खुश; पण 2019 मध्ये त्यांनी काय केले होते??


नाशिक : शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा देऊन त्यांचे नाव “राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार” हे पुढच्या आदेशापर्यंत कायम ठेवले. नव्या पक्षाला नवे चिन्ह देण्यासाठी निवडणूक आयोगाला आठवडाभराची मुदत दिली. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने मतदारांनी दिलेल्या कौलाला कमी लेखू नये. त्यांनी मूळ पक्षाच्या चिन्हावर मतदान केले आहे, असे परखड निरीक्षण नोंदविले.Sharad pawar now feels the importance of voters mandate!!

सर्वोच्च न्यायालयाच्या नेमक्या याच निरीक्षणावर शरद पवार खुश झाले आणि त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहून हा “लोकशाहीचा मोठा विजय” झाल्याबद्दल आपण खुश झाल्याचे जाहीरही केले.



अर्थातच पवारांना सर्वोच्च न्यायालयात आपल्याला पहिल्याच फेरीत विजय मिळाल्याचे भासले, पण पवारांनी जरी आपल्या ट्विटर हँडलवर ही खुशी जाहीर केली असली, तरी त्यातून एक सवाल उभा राहतो, तो म्हणजे जर अखंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर दिलेल्या मतदारांच्या कौलाला आज कमी लेखायचे नसेल, तर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या कौलाला स्वतः शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी उचित लेखले होते की कमी लेखले होते??

कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीतल्या मतदारांच्या कौलाला उल्लंघून तर ठाकरे – पवारांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर बसविले होते. त्यावेळी पवार – ठाकरे यांनी मतदारांनी दिलेल्या कौलाच्या बळावर नव्हे, तर एकत्रित आमदार संख्येच्या बळावर सरकार स्थापन केले होते. मतदारांनी दिलेला कौल आमदार संख्येच्या बळावर पळवून नेला होता!! पण त्यावेळी देखील पवारांना आणि त्यांच्या समर्थकांना तो “लोकशाहीचाच विजय” वाटला होता. मग त्यावेळी मतदारांचा कौल पळवून मिळवलेला “लोकशाहीचा विजय” आणि आता सर्वोच्च न्यायालयाने मतदारांच्या कौलाला दिलेले महत्त्व हा देखील “लोकशाहीचा विजयच”!!, अशी दुटप्पी भूमिका पवारांनी घेतल्याचेच त्यांच्या ट्विटर हँडल वरील लेखनावरून उघड झाले आहे.

 पवारांनी लिहिलेली पोस्ट अशी :

@PawarSpeaks छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. हा मतदारांचा विजय आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये, असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले याचे काय?, असा सवाल केला. आम्हाला पूर्णपणे मान्यता मिळू नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे सीमेपलीकडील परिस्थितीचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी आम्हाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि माननीय ECI ला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर ७ दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे नतमस्तक आहोत. लोकशाहीचा हा मोठा विजय आहे आणि डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या संविधानासाठी आम्ही लढत राहू. सत्यमेव जयते! #SupremeCourtofIndia रात्री ८:१७ · १९ फेब्रुवारी २०२४ · 39.8K दृश्ये 137 पुन्हा पोस्ट 3 कोट १,२३६ आवडी 8 बुकमार्क

सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल पवारांना “लोकशाहीचा विजय” वाटला आहे, पण 2019 मध्ये तर पवारांनी जनमताचा कौल तर धाब्यावर बसवून उद्धव ठाकरेंबरोबर युती करून सरकार बनविले होते.

वास्तविक त्यावेळी भाजप आणि उद्धव ठाकरेंची अखंड शिवसेना या महायुतीला महाराष्ट्राच्या मतदारांनी 161 जागांचे बहुमत देऊन मोठा कौल दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल होता. पण पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार त्यावेळी विरोधी बाकांवर बसविले नव्हते. उलट पवारांनी आणि ठाकरेंनी एकत्र येऊन ती महायुती फोडली. नवीन महाआघाडी तयार करून सरकार बनविले होते. त्यावेळी त्यांनी मतदारांच्या कौलाचा अपमानच केला होता. लोकशाहीचा खरा पराभवच केला होता!! पण त्यावेळी त्यांना अनुकूल परिस्थिती मिळाली होती म्हणून त्यांनी तो स्वतःहून “लोकशाहीचा विजय” ठरविला होता.

पण आता त्यांचा पक्ष फुटला. त्यांचेच सहकारी त्यांच्यापासून स्वतःहून दूर गेले, त्यावेळी मात्र त्यांना लगेच “लोकशाही धोक्यात” आल्याचे जाणवले. आपला मूळ पक्ष आणि मूळ चिन्ह आठवले. मूळ चिन्हावर दिलेला मतदारांचा कौल आठवला. म्हणूनच त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे परखड निरीक्षण “आपलेसे” वाटून लोकशाहीचा विजय झाल्याचे भासमान झाले!!… पण महाराष्ट्राच्या जनतेसमोर पवारांचा दुटप्पीपणा उघड्यावर आला!!

Sharad pawar now feels the importance of voters mandate!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात