‘काँग्रेसने १५ पेक्षा जास्त जागा मागितल्या, तर उत्तर प्रदेशमध्ये…’ ; ‘सपा’चा अल्टिमेटम!


विरोधकांच्या इंडिया आघाडीत अद्यापही एकमत होताना दिसत नाही.


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : लोकसभा निवडणुकीला फारसा वेळ उरलेला नाही, मात्र विरोधी पक्ष ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) यांच्यात जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नाही. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदलाने (आरएलडी) भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर उत्तर प्रदेशातील जागावाटपाचे गणित पुन्हा एकदा बिघडले आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाने काँग्रेसला अल्टिमेटम दिला आहे.If Congress asks for more than 15 seats there will be no alliance in Uttar Pradesh SP ultimatum



सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समाजवादी पक्षाने काँग्रेसला 15 जागांची यादी दिली असून ही अंतिम यादी असेल असे म्हटले आहे. या 15 जागांवर काँग्रेसचे एकमत झाले तर उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीशी युती होईल. काँग्रेसने यापेक्षा जास्त जागांची मागणी केल्यास सपाला ते मान्य होणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, “काँग्रेसला आज सपाला उत्तर द्यायचे आहे. काँग्रेसने संमती दिली तरच उद्या अखिलेश यादव रायबरेलीतील भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींसोबत सहभागी होतील. जर तोपर्यंत संमती दिली नाही, तर अखिलेश राहुलच्या यात्रेपासून दुरावू शकतात.उत्तर प्रदेशातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची शुक्रवारी चंदौली जिल्ह्यातून सुरुवात झाली. रायबरेलीतील या यात्रेत सहभागी होणार असल्याचं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं होतं. ही यात्रा उत्तर प्रदेशातून राजस्थानकडे जाईल.

If Congress asks for more than 15 seats there will be no alliance in Uttar Pradesh SP ultimatum

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात