लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉनची भरदिवसा हत्या, लग्न समारंभात हल्लेखोराने केला गोळीबार


हल्लेखोराचाही गोळीबारात झाला मृत्यू


विशेष प्रतिनिधी

लाहोर : पाकिस्तानमध्ये दररोज गोळीबार आणि हत्यांच्या बातम्या येत असतात. मात्र यावेळी इतरांना घाबरवणाऱ्या डॉनलाच गोळ्या घालण्यात आल्या आहेत. एका रिपोर्टनुसार, लाहोरचा हा अंडरवर्ल्ड डॉन एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याच्यावर गोळीबार झाला.Underworld don killed in broad daylight in Lahore assailant opened fire during wedding ceremonyवास्तविक, लाहोरच्या माल वाहतूक नेटवर्कचा मालक आणि डॉन अमीर बालाज टिपू यावर चुंग भागात एका लग्न समारंभात अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. ज्यामध्यो तो मारला गेला. या अगोदर 2010मध्ये अल्लामा इक्बाल विमानतळावर अमीरवर जीवघेणा हल्ला झाला होता.

पोलिसांच्या अहवालानुसार, हल्लेखोराने बालाज आणि इतर दोन जणांवर गोळीबार केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. बालाजच्या साथीदारांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, परिणामी हल्लेखोराचा मृत्यू झाला. मात्र, त्याला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करूनही बालाजचाही जिना रुग्णालयात मृत्यू झाला. बालाजचे आजोबा देखील एका जुन्या भांडणात अडकले होते ज्यामुळे त्याचे कुटुंब हिंसाचाराशी जोडले गेले होते, असे स्थानिक वृत्तपत्र डॉनने वृत्त दिले आहे.

Underworld don killed in broad daylight in Lahore assailant opened fire during wedding ceremony

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात