हजारो नाशिककरांच्या साक्षीने रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या गंगा गोदावरी आरतीला प्रचंड उत्साहात प्रारंभ!!


विशेष प्रतिनिधी

नाशिक : श्रीक्षेत्र काशी मधील गंगा आरतीच्या धर्तीवर पवित्र गंगा गोदावरी आरतीला शिवजयंती दिनी 19 फेब्रुवारीला भव्य कार्यक्रमात सुरुवात झाली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हजारो नाशिककर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. आता गोदावरी आरती हा उपक्रम रामतीर्थ गोदावरी सेवा समिती दररोज नियमितपणे सुरू ठेवणार आहे.The Ganga Godavari Aarti of Ramtirth Godavari Seva Samiti started with great enthusiasm in the presence of thousands of Nashikkars!!

गोदावरी आरतीच्या आजचाया सुरुवातीच्या उपक्रमात विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक यांनी प्रातिनिधिक आशीर्वचन उच्चारले. दास गणू महाराजांच्या पंक्तींनी सुरुवात करीत दादा वेदक म्हणाले, हजारो नाशिककरांनी सतीचे वाण हाती घेत आजच्या दिवशी गंगा गोदावरीच्या नियमित आरतीचा फार मोठा संकल्प केला आहे. आता इथून पुढे समस्त हिंदू समाजाने एकसंध राहून समरस होऊन स्वयंप्रेरणेने धर्माचरण करावे. समितीचे हे कार्य समाजकल्याणासाठी वृद्धिंगत होवो, अशी त्यांनी प्रार्थना केली.



पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जोवर इतिहास राहील तोपर्यंत ही गंगा गोदावरीची आरती होत राहील. आपण सारे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत.

गोस्वामी महाराज दीक्षित म्हणाले की ही गंगा गोदावरीची आरती म्हणजे समस्त समाजाच्या मनोवांछित गोष्टींसाठी गोदामाईकडे प्रार्थना आहे. गोदावरी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचा संकल्प करून तिचे आजपासून नित्य दर्शन, स्मरण करू या.

ISKON नाशिकचे प्रमुख शिक्षाष्टकम् प्रभुजी यांनी सांगितले की, आई अपत्याचे पोषण करते, त्याबदल्यात तिचे ऋण अपत्य फेडू शकत नाही, तर ते केवळ कृतज्ञता व्यक्त करू शकते. हाच भाव या गंगा गोदावरीच्या आरतीमागे असावा. गंगा गोदावरी हे भगवंताचे पार्षद असून त्याच्यापेक्षाही जास्त कृपाळू आहेत.

नाशिक ही पद्मनगरी आहे या पद्मनगरीत गंगा गोदावरी महाआरतीचा आता शंखनाद सुरू झाला आहे. हे कार्य हाती घेणाऱ्या समस्त हिंदू समाजाला आणि समितीला भरघोस यश प्राप्त होवो, असे आशीर्वचन स्वामी सखा सुमंत यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष शांतारामशास्त्री भानोसे, श्री नृसिंहकृपा दास, सचिव मुकुंद खोचे, कोषाध्यक्ष सौ. अशिमा केला, डॉ. अंजली वेखंडे, प्रफुल्ल संचेती, राजेंद्र फड, चिराग पाटील, शिवाजी बोंदर्डे आणि शेकडो नाशिककरांनी परिश्रम घेतले.

– गंगा गोदावरी जन्मोत्सव पूजन

तत्पूर्वी गंगा गोदावरी जन्मोत्सवानिमित्त आज सकाळी समस्त हिंदू समाजातील विविध ज्ञाती बांधवांच्या दांपत्यांच्या हस्ते गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री स्वामी सखा सुमंत उपस्थित होते शांतारामशास्त्री भानोसे यांनी पौरोहित्य केले.

१. डॉ. मनोज पटेल २. श्री. अरुणभाई गांधी ३. श्री. गुणवंत मणियार ४. श्री. दीपक हिरे ५. श्री. कृष्णा ठाकरे ६. श्री.प्रमोद घोडेकर ७. श्री. पवन गुरव ८.श्री.शरद जाधव ९.श्री.सुनील वाघमारे १०.श्री.अनुप गोसावी ११.श्री. हरिष बैजल १२.श्री.कैलास हादगे १३.श्री.त्रंबक वाघ १४.श्री.अजिंक्य महंकाळे १५.श्री.निरंजन तांबट १६. श्री. नंदकुमार पाटील १७. श्री. पंकज पाठक १८. श्री.पी.एम. सैनी १९.श्री.दादा निंबोळे २०.श्री.प्रवीण संचेती २१. श्री.चंद्रकांत अहिरे २२. श्री. सुरेश मारू २३. श्री. गणेश आवनकर २४. श्री. ठाकूर
२५. श्री. संजय मेवानी

हे सर्वजण गंगा गोदावरी पूजनात अत्यंत उत्साहात सहभागी झाले.

The Ganga Godavari Aarti of Ramtirth Godavari Seva Samiti started with great enthusiasm in the presence of thousands of Nashikkars!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात