जालन्यातील मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राजकारण साधून घेण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्ष आंदोलन स्थळावर ते गेल्यानंतर तिथे मराठा तरुणांनी त्यांच्या विरोधात केलेली घोषणाबाजी त्यांना ऐकावी लागली.Sharad pawar did maratha politics in lifetime, but maratha youth exposed him in jalna
गेल्या 40 वर्षात तुम्ही केलं काय??, तेव्हा आत्ता इथं आलात!!, दुर्री तिर्री एक्का, पवार छ*, एवढ्या संतप्त घोषणा मराठा तरुणांनी दिल्या. या घोषणांचा अर्थ साधासुधा नव्हे. गेल्या 50 – 55 वर्षांच्या पवारांच्या राजकारणाची ती फलश्रुती होती.
कारण सत्तेवर असले की मराठा आरक्षणाचा मुद्दा बासनात आणि सत्तेतून पायउतार होताच राजकारणाच्या अंगणात, हे पवारांच्या कूटनीतीचे वैशिष्ट्य आहे. पवारांची ही खलप्रवृत्ती मराठा तरुणांनी ओळखून त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली असेल का??, हा कळीचा सवाल आहे. कारण शालिनीताई पाटलांपासून ते उदयनराजे भोसले या पवारांच्या एकेकाळी निकटवर्ती असलेल्या नेत्यांची वक्तव्ये याची साक्ष देतात.
शालिनीताई पाटलांनी 2004 पासून मराठा आरक्षणाचा मुद्दा विधिमंडळात उचलून धरण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आणि पवार सूत्रधार. त्यामुळे या मुद्द्याला कायमच त्यांनी बगल दिली. पवारांनी त्यांच्या सत्ता काळात कधीच विधिमंडळाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावर तो विषय येऊ दिला नाही, अशी उघड वक्तव्ये शालिनीताई पाटलांनी केली होती. त्यानंतर त्या बरीच वर्षे पवारांपासून दूर राहिल्या.
2014 नंतर आपले “नावडते” देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर आरुढ होताच पवारांना आपणच बासनात गुंडाळून ठेवलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आठवला आणि त्यानंतर पुढाऱ्यांच्या बिन चेहऱ्याचे मराठा आंदोलन उभे राहिले. लाख – लाख लोकांचे 58 मराठा मोर्चे निघाले.
पण त्या काळात देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याने मराठा समाजासाठी जे केले, ते बाकी कोणाही मराठा नेत्याने केले नाही याची साक्ष स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली होती. त्यांनी त्यांच्या परखड शैलीत मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांचे अक्षरशः वाभाडे काढले होते. हा इतिहास फार जुना नाही. तीन-चार वर्षांपूर्वीचा आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 16 % आरक्षण दिले, पण ते 12 % पर्यंत मिळून हायकोर्टापर्यंत टिकले.
2019 मध्ये सरकार गेल्यानंतर अडीच वर्षे ठाकरे – पवार सरकार चालले आणि मराठा आरक्षणाचा घोळ सुप्रीम कोर्टात घातला गेला. त्यात ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण हा विषय अतिशय चतुराईने घुसविला. त्यामुळे राजकीय आणि कायदेशीर गुंतागुंत वाढली.
पण हे सगळे पवारांनी स्वतः “अलिप्त” राहून केले होते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत सजग घटक असणाऱ्या मराठा तरुणाच्या हे लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. ज्यांच्या राजकीय आयुष्याची निम्मी वर्षे सत्तेत आणि निम्मी वर्षे विरोधात गेली, त्यांनी सत्ता काळात मराठा समाजासाठी काय केले?? हा नेमका प्रश्न विचारून या तरुणांनी पवारांच्या राजकारणाची मुख्य नस दाबली. यात त्यांचे काय चुकले??
देवेंद्र फडणवीस यांना जातीवरून पवारांनी टार्गेट केले. पण फडणवीसांनीच “सारथी” सारखी संस्था उभारली
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अर्थसहाय्य वाढविले
आर्थिक मागास निकष लावून मराठा समाजाला सवलती मिळवून देण्याची सोय केली.
खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील गडकोट सुधारणा योजना सुरू केली त्यासाठी तब्बल 600 कोटी रुपयांची तरतूद केली. या कामांची मोठी जंत्री पवारांनी झाकली, म्हणून ती उगवायची राहिली नाही.
मराठा समाजातले सर्वांत प्रभावी नेते फडणवीसांनी भाजपच्या छत्रछायेखाली आणले. त्यात मोहिते पाटलांपासून रामराजे निंबाळकर, अजित पवारांचा समावेश आहे. ही बाब मराठा तरुणांच्या नजरेआड राहाणे तरी शक्य होते का??
त्यामुळे जालन्यातील मराठा आंदोलनाच्या निमित्ताने पवारांनी भरपूर राजकारण साधून घेण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात मात्र त्यांना उफराट्या घोषणांना सामोरे जावे लागले. हे कशाचे लक्षण मानायचे?? हा कळीचा मुद्दा नाही का??
कांदा विषय तर जातीपातीच्या पलीकडचा होता पण…
इतकेच काय, पण कांदा उत्पादक शेतकरी हा काही जातीपातीचा विषय नव्हे, तो त्या पलीकडचा आहे. पण सत्तेवर असताना कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक निर्णय घ्यायचे नाहीत. पण केंद्र सरकारने प्रतिक्विंटल 2410 रुपयांचा भाव जाहीर केल्यानंतर तो भाव 4000 रुपये करा, असे विरोधात बसून सांगायचे, हे राजकारण पवारांनी केले. यातली “राजकीय मेख” न ओळखण्याइतपत शेतकरी बांधव दूधखुळे आहेत का?? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर पवारांच्या या वर्तणुकीतली राजकीय विसंगती उघडपणे बोलून दाखविली.
नाशिकमध्ये 2004 मध्येच पवारांच्याच मेळाव्यात कांदा उत्पादकांनी पवारांना कांदे फेकून मारले होते. हे पवारनिष्ठ माध्यमे विसरली असतील, पण म्हणून मराठा तरुण विसरले असे कसे मानता येईल??, किंबहुना ते विसरले नाहीत, याचेच प्रत्यंतर जालन्यात त्यांनी पवार विरोधी घोषणा देऊन आणून दिले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App