‘वन नेशन-वन इलेक्शन’वर NDAचं पारडं होतयं भारी, YSRCP ने समर्थन करत ‘INDIA’ आघाडीला दिला धक्का!


सरकारने  समिती स्थापन केले असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तिचे अध्यक्ष बनवले  आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 18 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. ही घोषणा झाल्यापासून विरोधी पक्षांमध्ये नाराजी वाढली आहे. विशेष अधिवेशनात ‘वन नेशन-वन इलेक्शन’शी संबंधित विधेयक आणले जाण्याची शक्यता आहे. सरकारने ‘एक देश-एक निवडणूक’ या समितीची स्थापना केली असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तिचे अध्यक्ष बनवले  आहे. YSRCPs support for One Nation One Election shocked the INDIA Alliance

विशेष अधिवेशनात ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक आणण्याच्या बाबतीत संसदेतील आकडेवारीचा विचार केला जात आहे, कारण या आकडेवारीच्या आधारेच विधेयकाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. बरं, या आकडेवारीत सत्ताधारी पक्ष आतापासूनच मजबूत होऊ लागला आहे, कारण काही बिगर भाजप पक्षही त्याच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत. ‘वन नेशन-वन इलेक्शन’च्या चर्चेदरम्यान, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष YSRCP ने ‘I-N-D-I-A’ ला झटका दिला आहे आणि ‘वन नेशन-वन इलेक्शन’च्या समर्थनार्थ उभा राहिला आहे.

वायएसआरसीपीचे सरचिटणीस व्ही विजयसाई रेड्डी यांनी शनिवारी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या प्रस्तावाची बाजू मांडताना सांगितले की, त्यात अनेक सकारात्मक गोष्टी आहेत आणि हजारो कोटी रुपयांची बचत करण्यात मदत होऊ शकते. विजयसाई रेड्डी हे स्वतः आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्षाचे राज्यसभा सदस्य आहेत.

YSRCPs support for One Nation One Election shocked the INDIA Alliance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात