7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि आसपासच्या भागात काही वाहतूक नियम लागू होऊ शकतात.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. दिल्ली सरकारने यापूर्वीच कडक सुरक्षा व्यवस्थेसह तीन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. आता सुरक्षेच्या दृष्टीने उत्तर रेल्वेने 207 गाड्या तीन दिवसांसाठी रद्द केल्या आहेत. उत्तर रेल्वेने शनिवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, हा आदेश 9, 10 आणि 11 सप्टेंबर असे तीन दिवस लागू राहील. As many as 207 trains of Northern Railway canceled for three days Decision due to G20 Summit
उत्तर रेल्वेने सांगितले की, “नवी दिल्लीतील G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, 9, 10 आणि 11 सप्टेंबर रोजी एकूण 207 ट्रेन सेवा रद्द केल्या जातील. 36 ट्रेन सेवा शॉर्ट टर्मिनेटेड/शॉर्ट ओरिजिनेटेड असतील.”
G-20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये होणार आहे. सर्व देशांचे प्रतिनिधी राजघाट, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) आणि भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) पूसा येथेही भेट देतील. 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि आसपासच्या भागात काही वाहतूक नियम लागू होऊ शकतात. फक्त NDMC आणि NH-48 वर रहदारी निर्बंध असतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App