Raibareli Results : जी – 23 नेत्यांनो, अ. भा. काँग्रेसचे पुनरूज्जीवन सोडा; आधी “रायबरेली”ला पर्यायी नवा “वायनाड” शोधा…!!


काँग्रेसचे जी – 23 नेते कमालच करतात…!! गेल्या 2 वर्षांपासून त्यांना स्वतःला काही उद्योग उरला नाही, म्हणून ते काँग्रेस हायकमांडला अधून मधून पत्र लिहून, पत्रकार परिषदा घेऊन नुसते टोचत राहतात. स्वतः काही करायचे नाही आणि काँग्रेस हायकमांडला काम करू द्यायचे नाही असले उद्योग हे जी – 23 गटाच्या नेते करत राहतात…!!Raibareli Results: G – 23 leaders a Bh Leave the revival of Congress Find an alternative new Wayana to Rae Bareli first

 काँग्रेस हायकमांड मागे टुमणे

आता उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला, यात काही नवीन बातमी आहे का…?? गेल्या कित्येक वर्षांत मध्ये कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ व्हायचे राहिले आहे का…?? मध्यप्रदेश राजस्थानचा अपवाद सोडून द्या पण बाकीच्या कुठल्या राज्यात तरी काँग्रेसने आपला झेंडा बुलंद केला आहे का…?? नाही ना… तरी पण आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याचे माहिती असून देखील हे काँग्रेसच्या जी – 23 गटाचे नेते उगाचच काँग्रेस हायकमांडच्या पाठीमागे काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे सतत टुमणे लावत असतात…!!



जी – 23 नेते स्वतः काय करणार?

बरं… काँग्रेसला हायकमांडला टुमणे लावायला हरकत नाही. पण हे स्वतः काँग्रेससाठी इथून पुढच्या काळात नेमके काय करणार आहेत??, हे तरी या जी – 23 गटातल्या त्यांना माहिती आहे का…?? काँग्रेससाठी काही करण्याची त्यांची क्षमता उरली आहे का…??
जी – 23 गटाच्या प्रत्येक नेत्याची सत्तरी ओलांडली आहे. हे स्वतः हा त्यांच्या उमेदीच्या काळात स्वतःच्या बळावर काँग्रेससाठी खूप मोठ्या जागा निवडून आणत होते का…??
या प्रश्नाचे उत्तर तद्दन नकारात्मक आहे…!!

 राज्यसभेचे मानकरी

जी – 23 घाटातले बहुतेक नेते हे राज्यसभेचे मानकरी होते. हे नेते काँग्रेसच्या दर पराभवानंतर आपल्या जुन्या पत्राची नवी आवृत्ती काढत बसतात. आता या जी- 23 गटातल्या नेत्यांना हे कोण सांगणार…!! अहो, काँग्रेसचे पुनरूज्जीवन, काँग्रेसला पुन्हा संजीवनी, काँग्रेस नेतृत्वामध्ये लोकशाहीकरण हे विषय जुने झाले… ते आता सोडा… आणि जरा सूक्ष्मदर्शक भिंग लावून काँग्रेसच्या पराभवाकडे नीट पाहा…!! अहो, आता “रायबरेली”ला पर्याय ठरेल असा नवा “वायनाड” शोधायला लागा…!!2019 मध्ये अमेठीत जसा मार खाल्ला ना… असाच मार 2024 मध्ये रायबरेली मध्ये खावा लागणार आहे…!!, हे लक्षात घ्या…!!

 अमेठीत पडला मार

2019 मध्ये अमेठीत मार पडणार आहे, असे गृहीत धरून आधीच “वायनाड” शोधला ना… तसाच आता “रायबरेली”ला पर्याय ठरेल असा नवा “वायनाड” शोधायला लागा…!! 2019 ची “अमेठी” घडण्यापूर्वी 2017 मध्ये अमेठी लोकसभा मतदार संघामध्ये समाविष्ट असणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जे घडले होते, म्हणजे कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला होता ना… तसाच 2022 च्या निवडणुकीत रायबरेली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुपडा साफ झाला आहे…!!

रायबरेली मतदार संघात समाविष्ट असलेल्या 7 पैकी 4 जागा समाजवादी पार्टीने आणि 2 जागा भाजपने जिंकल्यात. भाजपचे जिंकलेले उमेदवार आदिती सिंह आणि राकेश हे पूर्वाश्रमीचे सोनिया-राहुल निष्ठ काँग्रेसचे आमदार होते. आता अशा स्थितीत रायबरेलीतून जे काँग्रेसचे सर्वोच्च हायकमांड लोकसभेत प्रतिनिधित्व करते, त्यांनाच अर्थात सोनिया गांधी यांनाच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी धोका उत्पन्न झाला आहे…!!, हे लक्षात घ्या.

“सेफ” वायनाड उरलाय का??

त्यामुळे काँग्रेसचे पुनरूज्जीवन, काँग्रेसच्या नेतृत्वाचे लोकशाहीकरण हे विषय फार दूर राहिले आहेत. ते नंतर करता येईल. (काँग्रेस उरली तर) आधी “रायबरेली”ला सेफ पर्यायी मतदारसंघ ठरेल असा नवा “वायनाड” शोधा. म्हणजे विद्यमान सर्वोच्च काँग्रेस हायकमांडला पर्यायी “वायनाड” मतदार संघातून निदान लोकसभेत तरी 2024 मध्ये पोहोचता येईल…!!

नाही तर लोकसभेत काँग्रेस हायकमांडच्या घराण्यातले प्रतिनिधीच कोणी मउरले नाहीत तर काँग्रेस तरी शिल्लक राहील का…??, याचा जी – 23 गटाने विचार करावा. उगाच आपल्याला जे कधीच जमले नाही त्या काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे टुमणे सतत हायकमांडच्या मागे लावू नका… ते लावण्यात आता काही मतलब उरलेला नाही… हे लक्षात घ्या या आणि नाही घेता आले तर निदान शांत तरी बसा…!!

Raibareli Results: G – 23 leaders a Bh Leave the revival of Congress Find an alternative new Wayana to Rae Bareli first

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात