वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाचे नियम तोडून सुमारे 50 जणांच्या जेवणाची व्यवस्था केल्याप्रकरणी भवानी पेठेतील हॉटेल मिलनच्या मालकाला 1 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. Pune Hotel Operator Fined Rs 1 Lakh For Violating Corona Rules
महापालिकेने हॉटेल मालकाकडून हा १ लाख रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली नसल्याने, राज्यभरात ३१ मे अखेर पर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. त्या दरम्यान अनेक गोष्टीवर निर्बंध लादले असून हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सेवा देण्याची मूभा आहे.
मात्र, पुण्यातील भवानी पेठेतील हॉटेल मिलनच्या मालकाने नियमांच उल्लंघन केले. हॉटेलमध्ये ४० ते ५० नागरिकांना प्रवेश देऊन, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. या बाबतची माहिती भवनी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख रुपयांचा दंड मालकासआकारला आहे. दंडाचा धनादेश घेण्यात आला आहे. भविष्यात नियम तोडल्याने उघड होताच हॉटेल सील केले जाईल, अशी समज देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App