Lockdown Effect : मुंबईच्या सोने बाजाराचे ८०० कोटींचे नुकसान; लॉकडाऊनमुळे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला


वृत्तसंस्था

मुंबई : लॉकडाऊनमुळे सराफी दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरही सोने खरेदी झाली नाही. फक्त मुंबईतील सोने बाजाराचे ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला. Lockdown Effect ; Mumbai’s Gold market loses Rs 800 crore.

गेल्या वर्षीही पाडवा आणि अक्षय्य तृतीयेला लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद होत्या. आता तर सोन्याचे दरही कमी होऊ लागले आहेत. पण, ग्राहक ते खरेदी करायला येत नाही.


सोन्याच्या किमतीत आतापर्यंत 11 हजार रुपयांची घट, गुंतवणूक किती सुरक्षित, जाणून घ्या…


दरवर्षी सणांच्या मुहूर्तांवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. यंदा बाजारपेठेत मात्र शुकशुकाट होता.

सोने झाले स्वस्त.. पण, लंकेत सोन्याच्या विटा

सोन्याने प्रतितोळा ५६ हजारांपर्यंत उच्चांक गाठला होता. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रतितोळा ५२ हजारांच्या आसपास होता. तर यंदाच्या तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा ४९ हजार होता.

Lockdown Effect ; Mumbai’s Gold market loses Rs 800 crore.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण