Prashant Kishore : फक्त विजयाचा वाटेकरी, पण पराभूतांमध्ये विजयाची जान फुंकण्याची नाही क्षमता!!


निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. त्यांनी काँग्रेसला २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत विजयी करण्यासाठी ३७० ते ४०० जागांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या बातम्या जुन्या झाल्या.Prashant Kishore: Only the sharer of victory, but not the ability to infuse victory in the losers

पण प्रश्न हा आहे, की प्रशांत किशोर यांच्याकडे पराभूत मानसिकतेच्या काँग्रेसमध्ये विजयाची जान फुंकण्याची क्षमता आहे का… या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रशांत किशोर यांनी २०१४ पासून ज्या पक्षांसाठी आणि नेत्यांसाठी निवडणूकीचे काम केले, त्या कामांचा धांडोळा घेतला असता त्याचे उत्तर नकारात्मकच येते.

किंबहुना प्रशांत किशोर हे विजयाची शक्यता असणाऱ्या पक्षाबरोबर आणि नेत्या बरोबरच काम करतात आणि पराभूतांबरोबर यशस्वी काम करू शकत नाहीत, असेच २०१४ ते २०२२ पर्यंतच्या निवडणूक डेटाच्या आधारावर दिसून येते.



२०१४ – प्रशांत किशोर यांचे नाव झाले, २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी भाजप बरोबर विशेषतः नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम केले तेव्हा. त्यांनी मोदींसाठी चाय पे चर्चा सारखे सक्सेसफुल कार्यक्रम आखले. सोशल मीडिया कँपेन यशस्वीपणे चालविले. त्यातून मोदींचा संपूर्ण बहुमताचा विजय साकारला. प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी त्यावेळी कामाला आल्याची चर्चा झाली.

२०१५ – प्रशांत किशोर यांनी वर्षभरातच भाजप बरोबरचे काम संपवून ते नितीश कुमारांकडे २०१५ मध्ये दाखल झाले. त्यावेळी नितीश कुमारांनी भाजपशी नाते तोडले होते. त्यांना लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर जायला सांगणे. ती आघाडी काही काळ यशस्वी करणे यात प्रशांत किशोर यांचा वाटा होता. त्या वेळी नितीश कुमार प्रशांत किशोर यांच्या एवढे प्रेमात होते, की त्यांनी प्रशांत किशोर यांना आपले नियोजन मंडळातले सल्लागार नेमून टाकले. पण नितीश – लालू आघाडी फार काळ चालली नाही. नितीश कुमार एनडीएमध्ये परतले. त्यांनी सीएए कायद्याचे समर्थन करताच प्रशांत किशोर यांचे नितीश कुमारांबरोबरचे राजकीय नाते संपुष्टात आले.

२०१७ – प्रशांत किशोर यांनी पंजाबमध्ये काँग्रेससाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी संधान बांधले. कॅप्टन अमरिंदर सिंग जिंकले. त्यांनी ट्विट करून विजयाचे श्रेय प्रशांत किशोर आणि टीमला दिले.

पण त्याच वर्षी प्रशांत किशोर यांनी काँग्रेससाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी काम केले. शीला दीक्षित यांच्या सारख्या वृद्ध महिलेला मुख्यमंत्रीपदाची उमेदवार म्हणून जाहीर करण्याची आयडियेची कल्पना प्रशांत किशोर यांनी लढवली… पण ते पुरते फेल गेले. काँग्रेसची नौका ते गंगेपार करू शकले नाहीत. २०२२ मध्ये देखील प्रशांत किशोर बाहेरून काँग्रेसला प्रियांकांना मुख्यमंत्रीपदाच्या जाहीर करण्याचे सल्ला देऊ लागले होते. पण त्यांचे बाहेरच्या सल्ल्याचे मॅजिक चालले नाही.

२०१९ – आंध्रात प्रशांत किशोर यांनी वायएसआर जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी काम केले. त्यांची प्रजा संकल्प यात्रा यशस्वी केली. समरा संखावरम, अन्ना पिलुपू हे कार्यक्रम यशस्वी केले. त्यातून जगनमोहन रेड्डी यांचा विजय जरूर साकार झाला, पण त्यामध्ये वायएसआर राजशेखर रेड्डी यांची पुण्याई अधिक कामाला आल्याची वस्तुस्थिती जगनमोहन रेड्डींनी लक्षात आणून दिली.

२०२० – प्रशांत किशोर यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पार्टीचे काम केले. पण बिहारामध्ये जतीन राम मांझी, उपेंद्र कुशवाह, मुकेश सहानी यांनी भेटून आपल्यासाठी काम करण्याची गळ घातली तेव्हा प्रशांत किशोर यांनी त्यांच्यासाठी काम करायला नकार दिला. पण बात बिहार की हा कार्यक्रम चालविला. अर्थात त्याला फारसे यश मिळाले नाही.

२०२१ – तामिळनाडू आणि बंगाल निवडणूकीत प्रशांत किशोर यांनी एम. के. स्टालिन आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम केले. यातल्या ममतांशी प्रशांत किशोर यांचा विशेष राजकीय लगाव सगळ्यांच्याच लक्षात आला. विशेषतः ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी जवळीक तृणमूळ काँग्रेसच्या अनेक नेत्यांना दुखवून गेली. सुवेंदू अधिकारी हे तृणमूळ काँग्रेसमधून बाहेर पडायला प्रशांत किशोर कारणीभूत ठरल्याचे बोलले गेले. ममता जिंकल्या. पण प्रशांत किशोर यांना त्यांनी आपला सल्लागार नेमले. पण तृणमूळ काँग्रेसमधल्या एका मोठ्या सेक्शनमध्ये प्रशांत किशोर विषयी अविश्वास तयार झाला ही वस्तुस्थिती आहे.

त्यानंतर प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम सोडल्याचे जाहीर केले. काही तरी वेगळे करण्याचे मनसूबे बोलून दाखविले. पण आता त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या बातम्या आल्या आहेत.

कौशल्य कमी, चलाखी जास्त

पण एकूण त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला, तर ते अतिशय चलाखीने विजयी कॉम्बिनेशच आपल्या कामासाठी निवडतात. विजय झाला की आपोआप त्यांच्या वाटा असल्याची चर्चा घडवतात. पण पराभूताला विजयी करण्याची त्यांच्यात क्षमता नाही. किंबहुना निवडणूकीचे पारडे फार मोठ्या प्रमाणात फिरवून दाखविण्याची देखील त्यांची ताकद नाही. एवढेच काय पण पराभवाची जबाबदारी झटकून त्यापासून किनारा करण्याचे कमावलेले कौशल्य हे प्रशांत किशोर यांचे विशेष वैशिष्ट्य असल्याचे त्यांच्या बरोबर काम केलेल्यांचे मत आहे.

Prashant Kishore: Only the sharer of victory, but not the ability to infuse victory in the losers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात