Congress Prashant Kishore : प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्या; पण ते काम काँग्रेसचे करणार की प्रादेशिक पक्षांचे…??


निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. एवढेच नाही, तर प्रशांत किशोर यांनी काँग्रेससाठी लोकसभा निवडणूक २०२४ साठी एक प्रेझेंटेशन तयार करून काँग्रेसने ३७० ते ४०० जागांचे टार्गेट ठेवावे, असे या प्रेझेंटेशनधमध्ये सप्रमाण दाखवून दिले आहे. अर्थात अशी बातमी आली आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी ती खरी असल्याचे म्हटले आहे, पण या बातमीची अधिकृत पुष्टी काँग्रेस अथवा प्रशांत किशोर या दोघांनीही केलेली नाही. prashant kishore may join congress, but will he work for the congress or smaller parties?

-मूळ बातमी जुनी पण…

पण प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ही बातमी तशी नवी नाही. ती यापूर्वी किमान दोनदा तरी येऊन गेली आहे. अगदी त्यांनी राहुल गांधींशी फायनल चर्चा केल्याची बातमीही आली होती. पण त्यानंतर फारशी काही राजकीय हालचाल दिसली नव्हती. पण त्या वेळच्या बातमीत आणि आजच्या बातमीत फरक हा आहे, की प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसचे आकड्याचे टार्गेट निश्चित केले आहे. अर्थात यालाही अधिकृत हवाला नसून सूत्रांचाच हवाला आहे. पण तरीही तो खरा मानायला हरकत नाही.

-राजकीय मेख

पण प्रश्न त्या पुढचा आहे, की प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे खरे मानले, ही मागच्या बातमीसारखी नुसती हुल नाही, असे मानले तरी प्रशांत किशोर नेमके काम कोणासाठी करणार…?? काँग्रेससाठी की प्रादेशिक पक्षांसाठी…?? हा खरा कळीचा प्रश्न आहे… किंबहुना हीच खरी राजकीय मेख आहे.

-३७० ते ४०० जागांचे टार्गेट

प्रशांत किशोर यांनी काँग्रेससाठी लोकसभेच्या जागांचे टार्गेट सेट करताना ३७० ते ४०० जागा लढविण्याचे टार्गेट सेट केले आहे… जिंकण्याचे नव्हे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे वरच्या २०० ते २२५ जागा त्यांनी आधीच प्रादेशिक पक्षांसाठी मोकळ्या करून घेण्याचा डाव आखलेला दिसतो आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेत्यांपुढे सादर केलेल्या प्रेझेंटेशनमध्येच ही राजकीय मेख दडलेली आहे. हे एक प्रकारे १० ते १२ प्रदेशांमध्ये काँग्रेसने प्रादेशिक पक्षांचे कायमचे वर्चस्व मान्य करून टाकण्यासारखेच आहे. किंबहुना आज देशातल्या ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे निर्विवाद वर्चस्व तयार झाले आहे, तिथे काँग्रेसच्या अस्तित्वाला कायमची तिलांजली देण्यासारखेच आहे.

पण काँग्रेसपुढे हा प्रस्ताव स्वीकारण्यावाचून पर्याय नसल्याचे प्रशांत किशोर यांनी प्रेझेंटेशनमध्ये सूचविले आहे. आणि म्हणूनच शीर्षकात म्टल्याप्रमाणे प्रशांत किशोर हे काँग्रेससाठी काम करणार आहेत की प्रादेशिक पक्षांसाठी हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

-प्रशांत किशोर यांची बदलती भूमिका

प्रशांत किशोर यांची भूमिका आता फक्त बाहेरून निवडणूक रणनीतीकाराची उरलेली नाही, हे त्यांनी स्वतःच जाहीर केले आहे. पण ते एका पक्षात प्रवेश करून प्रत्यक्षात काम दुसऱ्या पक्षाचे करणार असे त्यांनी अधिकृतपणे म्हटले नसले, तरी प्रत्यक्षात ते तसेच दिसत आहे. प्रशांत किशोर यांची राजकीय निष्ठा किंवा कल ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे, हे उघड आहे. त्यांनी भाजपपासून वेगवेगळ्या पक्षांसाठी व्यावसायिक काम केले असले, तरी जेवढ्या निष्ठेने त्यांनी तृणमूळ काँग्रेससाठी काम केले तेवढे अन्य कोणासाठीही केले नाही, हे दिसले आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांचे काँग्रेसशी राजकीय वैरभाव टोकाचा आहे. ममतांनी बंगाल निवडणूकीत भाजप नेत्यांविरोधात जोरदार प्रचार केला. पण प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांना फोडून आपली तृणमूळ काँग्रेस बळकट केली. ममतांनी फक्त बंगालमध्येच काँग्रेस फोडली असे नाही, तर अन्य राज्यांमध्ये भाजपवर तोंडी तोफा डागताना प्रत्यक्षात काँग्रेसच फोडली आहे. आसाम, मणिपूर, गोवा, हरियाणा ही राज्ये ममतांच्या काँग्रेसफोडीच्या खेळीची साक्ष देतात.

-ममता बॅनर्जींकडे कल

अशा ममता बॅनर्जी यांच्या दिशेने प्रशांत किशोर यांचा राजकीय कल असल्याचे उघड दिसत आहे. ममता बॅनर्जी यांची महत्त्वाकांक्षा आता पंतप्रधानपदाची आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि त्यांनी काँग्रेससाठी लोकसभेच्या ३७० ते ४०० जागांचे टार्गेट सेट केले आहे, या बातमीकडे काकदृष्टीने पाहावे लागते. त्यातले खरे बिटविन द लाइन्स वाचावे लागते… आणि त्यातूनच हा प्रश्न तयार होतो… प्रशांत किशोर प्रवेश जरी काँग्रेसमध्ये करणार असले, तरी ते काम काँग्रेससाठी करणार की काँग्रेस पोखरून राजकीय पुष्ट बनलेल्या प्रादेशिक पक्षांसाठी… एवढेच…!!

prashant kishore may join congress, but will he work for the congress or smaller parties?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात