आजच्या हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी झाली हनुमंताची महाआरती आणि त्याच वेळी ठाकरे परिवारातच हिंदुत्वाच्या लागल्या शर्यती…!!, असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांच्या निमित्ताने हनुमान चालीसा भोंग्यावर लावण्याचा इशारा काय दिला आणि सगळेच राजकीय पक्ष विशेषतः शिवसेना खडबडून जागी होऊन पुन्हा “हिंदुत्व – भक्ती”च्या दिशेने वळली…Thackeray Hindutva Race: Hanumanta’s Maha Aarti; Hindutva races started in Thackeray family only
आमचे हिंदुत्व देवळात घंटा बडवणारे नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे त्यांनी 1992 – 93 च्या दंगली आणि बॉम्बस्फोटातील सिद्ध देखील केले. शिवसेनेचे हिंदुत्व कायम प्रखर राहिले पण आता शिवसेनेच्या हिंदुत्व डायल्यूशन येऊन नमाजाबरोबर त्यात महाआरती मिसळली आहे.
पुण्यात आज राज ठाकरे खालकर तालीम मारुती मंदिरात हनुमान चालीसा महाआरती करत असताना इकडे दादर मध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सी. पी. टँक परिसरात महाआरती करण्यात आली. फक्त शिवसेनेचा महारती तो फरक एवढा आहे, की तिथल्या स्थानिक मशिदीत नमाज पठणानंतर हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली वास्तविक रस्त्यांवरच्या नमाजाला सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाआरतीची धूम काढली होती शिवसेनेसाठी 1992 – 93 मध्ये ती कमालीची यशस्वी देखील झाली होती.
पण आता शिवसेनेने महाविकास आघाडीच्या धर्मनिरपेक्षतेचे वळण घेतल्यानंतर महाआरती कायम ठेवून त्याला नमाजाची पुस्ती जोडली आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात खालकर तालीम मारुती मंदिरात प्रचंड गर्दीत महाआरती झाली. ढोल-ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचे स्वागत झाले, तर इकडे दादर मध्ये शिवसैनिकांनी गर्दी करून आपणही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे समोर मागे पडायला नको म्हणून महाआरती करून घेतली.
पण या सगळ्या प्रकारात सगळा समाज महाआरतीच्या आणि हनुमंताच्या दिशेने वळला. अगदी शिवसेनेच्या पुढाकाराने सकाळी मातोश्री समोर जमलेल्या हजारो शिवसैनिकांना मध्ये काही मुस्लीम समाज शिवसैनिकांना आवर्जून समाविष्ट करण्यात आले. इतकेच नाही तर मनसेच्या हनुमान चालीसाला प्रत्युत्तर देण्यासाठी पुण्यात साखळी पीर तालीम मंडळाने हनुमंताचा प्रसाद मुसलमानांना रोजा सोडण्यासाठी दिला.
इतकेच नाही तर आज सकाळी नाशिक मध्ये शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले हनुमंताची पूजा केली. त्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा देखील जाहीर केला हिरवी महाविकास आघाडीच्या धर्मनिरपेक्ष अवगुंठणात आणि शरद पवार यांच्या प्रभावाखाली शिवसेना हिंदुत्वाचा विचारात पासून वाहून गेली होती. ती परत निदान मनसे समोर तरी आपण मागे पडता कामा नये म्हणून हिंदुत्वाच्या शर्यतीत सामील झाल्याचे दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App