विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता प्रयोगशाळेतच बनणार अन्न


वाढती लोकसंख्या, तापमानवाढीमुळे होणारे परिणाम आणि कमी होत जाणारे स्रोत, या पार्श्वभूमीवर असे नवे खाद्यपदार्थ आपल्या समोरील थाळीत येत्या काही वर्षांत वाढले जाऊ शकतात. अर्थात, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांना वेगवेगळे पदार्थ मिळू शकतील. वनस्पतींपासून तयार केलेले अंडे, फ्रट फ्लायच्या अळ्यांपासून तयार केलेला एनर्जी बार किंवा साखरविरहित प्रथिनांपासून तयार केलेली थंडपेये यांची कल्पना कधी केली आहे का?Now the food will be made in the laboratory

सर्वसामान्य माणसांच्या कल्पनाशक्तीेच्या पलीकडे असलेल्या या गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत. कदाचित, येत्या काही वर्षांत हे आपले नियमित खाणे असू शकेल. इस्राईलमधील फ्लाइंग स्पार्क या स्टार्टअपने चांगले पोषकमूल्य असलेले पदार्थ प्रयोगशाळेत तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संशोधनामुळे अन्नधान्य तयार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होऊ शकतो. फ्लाइंग स्पार्कमधील संशोधक फ्रुट फ्लायच्या अळीपासून प्रथिने आणि तेल तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

यासाठी प्रयोगशाळेतच अळीचे प्रजनन केले जात आहे. गाई, म्हशी, बकऱ्या, कोंबड्या इतकेच नव्हे तर मासे प्रयोगशाळेत तयार करण्यात अनेक अडचणी आहेत. त्यासाठी लागणारी जागा, पाण्याचा प्रश्न आहे. इतकेच नव्हे तर त्यातून पर्यावरणविषयक काही प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे कीटकांपासून प्रथिने मिळविणे जास्त सोपे आहे. फ्रुट फ्लायच्या अळ्या स्वच्छ केल्या जातात, नंतर त्यांची बारीक पूड केली जाते. या प्रक्रियेत त्यांच्या शरीरातील मेद तेलाच्या रूपाने वेगळा काढला जातो.

उर्वरित पुडीमध्ये 70 टक्के प्रथिने, तर 12 टक्के खनिजे असतात. या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाला हानिकारक अशा हरितगृहवायूंचे उत्सर्जन अत्यंत कमी प्रमाणात होते, तर पाणीही कमी लागते. अळ्या पूर्णपणे वापरल्या जात असल्याने कचरा निर्माणच होत नाही. तयार झालेली पूड ही प्रथिनयुक्त व पौष्टिक असते. अशा पुडीच्या साह्याने एनर्जी बार तयार करण्याचा मानस आहे. यामुळे आगामी काळात प्रयोगशाळेतील अन्न अनेकांच्या ताटात आल्यास आश्चर्य वाटायला नको.

Now the food will be made in the laboratory

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात